मकरसंक्रांत अशुभ नाही - दा.कृ. सोमण

By admin | Published: January 14, 2017 07:26 AM2017-01-14T07:26:46+5:302017-01-14T07:26:46+5:30

१४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या वर्षी मकरसंक्रांत

Makar Sankranti not bad - DK Soman | मकरसंक्रांत अशुभ नाही - दा.कृ. सोमण

मकरसंक्रांत अशुभ नाही - दा.कृ. सोमण

Next

मुंबई : १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या वर्षी मकरसंक्रांत शनिवार, १४ जानेवारी रोजी आली आहे. मकरसंक्रांतीविषयी काही गैरसमज आहेत. मकरसंक्रांती ही अशुभ नाही. मकरसंक्रांतीपासून दिनमान वाढत जाते. मकरसंक्रांती ही शुभच आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली.
आर्यांचे पूर्वज हे उत्तर ध्रुवप्रदेशात राहत होते. तेथे सहा महिन्यांची रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होतो, हे वाईट कसे असू शकेल? मकरसंक्रांत पौष महिन्यात असते, म्हणून पौष महिनाही गैरसमजांमुळे अशुभ मानला जातो हे सर्व चुकीचे आहे. पौष महिनाही वाईट किंवा अशुभ नसतो. पौष महिन्यात विवाहमुहूर्तही दिलेले असतात, असेही सोमण यांनी सांगितले.
मकरसंक्रांती थंडीमध्ये येत असते. थंडीमध्ये तीळ हे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. थंडीमध्ये आपल्या कोरड्या त्वचेला जर तिळाचे तेल लावले तर त्वचा तेजस्वी होते. वर्षभरात कुणाशी मतभेद किंवा भांडणे झाली असतील तर मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळगूळ देऊन बिघडलेले संबंध सुधारता येतात. मकरसंक्रांती दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची पद्धत आहे. काळ्या रंगाची वस्त्रे उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात. (प्रतिनिधी)

Web Title: Makar Sankranti not bad - DK Soman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.