तूर, चणाडाळ रेशनवर उपलब्ध करा

By admin | Published: November 7, 2015 03:09 AM2015-11-07T03:09:37+5:302015-11-07T03:09:37+5:30

गेल्या काही दिवसांपासून शंभरी ओलांडलेल्या तूरडाळ आणि चणाडाळीचे वितरण शिधावाटपातून करण्याची मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली आहे. या आधी किरकोळ

Make available on tur, chana dal ration | तूर, चणाडाळ रेशनवर उपलब्ध करा

तूर, चणाडाळ रेशनवर उपलब्ध करा

Next

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शंभरी ओलांडलेल्या तूरडाळ आणि चणाडाळीचे वितरण शिधावाटपातून करण्याची मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली आहे. या आधी किरकोळ व्यापाऱ्यांची ‘द मुंबई ग्रेन डीलर्स असोसिएशन’ने डाळींचे वितरण शिधावाटपाच्या माध्यमातून करण्याची मागणी केली होती.

संघटनेच्या प्रमुख मागण्या
एपीएल व बीपीएल भेदभाव न करता प्रत्येक रेशन कार्डधारकाला किमान १ किलो तूरडाळ रुपये ८० प्रति किलो दराने, व १ किलो चणाडाळ रुपये ६० प्रतिकिलो दराने उपलब्ध करून द्यावी. सर्व रेशन कार्डधारकांना रास्त दराने प्रतिकार्ड १ किलो खाद्यतेल, मैदा व रवा तसेच प्रति युनिट १ किलो साखर असा अतिरिक्त पुरवठा करावा. सर्व एपीएल रेशन कार्डधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे लाभ देण्यात यावेत. (प्रतिनिधी)

Web Title: Make available on tur, chana dal ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.