पुनर्विकासातील अडथळे दूर होण्यासाठी ठोस कायदा करा - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 06:14 AM2019-07-17T06:14:01+5:302019-07-17T06:14:25+5:30
डोंगरी येथे घडलेल्या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा समोर आला आहे.
मुंबईः डोंगरी येथे घडलेल्या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा समोर आला आहे. मुंबईमधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर होण्यासाठी ठोस कायदा करा, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मंगळवारी वर्षा बंगल्यावर याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
इमारत पुनर्विकासाच्या अनुषंगाने, मुंबईतील आमदारांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पुनर्विकास मान्यता देण्यास कायद्यात बदल करावे. जेणेकरून उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास लवकर होण्यास मदत होईल. तसेच मुंबईतील बिगर उपकरप्राप्त इमारतींचादेखील त्याच धर्तीवर पुनर्विकास व्हावा यासाठी नगरविकास विभागाने कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.