Join us

कर्नाटक सरकारसोबत संयुक्त करार करा, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 1:56 PM

यंदाच्या वर्षी आपल्या धरणात पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षाही जास्त आहे. तर, हवामान विभागाने पर्जन्यमान 95 ते 104  टक्के असल्याचं सांगितले आहे.

मुंबई - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत करार करण्याचं सूचवलं आहे. राज्यात यंदाही पर्जनमान्य गतवर्षीच्या तुलतेत सारखेच असल्याने गेल्यावर्षीप्रमाणेच कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांन पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनीकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करावी, असेही फडणवीस यांनी सूचवले आहे. 

अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत मुख्यमंत्रीस्तरीय बैठक घेऊन पूरपरिस्थिती येऊ नये यासाठी तसेच आपातकालिन स्थिती उद्भल्यास विसर्ग कसा असावा, याबाबत संयुक्त करार करण्याबाबत हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देण्यात आले आहे. आलमट्टी धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने, आपल्या नद्यांना पूर येऊन कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पूरस्थिती उद्भवण्याचा धोका असतो. तर, आलमट्टी धरणाचा विसर्गही एका टक्क्यापेक्षा जास्त वाढविल्यास कर्नाटकात पूरस्थिती निर्माण होते. त्यावेळी, आपल्या गरजेनुसार विसर्ग करण्यास ते असमर्थता दर्शवतात. त्यामुळे यासंदर्भात बैठक घेऊन पुढील उपाययोजना कराव्यात, असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.  

यंदाच्या वर्षी आपल्या धरणात पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षाही जास्त आहे. तर, हवामान विभागाने पर्जन्यमान 95 ते 104  टक्के असल्याचं सांगितले आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, कर्नाटक सरकारसोबत आत्ताच संयुक्त योजना तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी, मुख्यमंत्रीयस्तरावर बैठक व्हावी, असेही फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेपूरकर्नाटक