Join us

परीक्षा शुल्काबाबत योग्य निर्णय घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:06 AM

शिक्षण निरीक्षकांचे मालाडच्या शाळेला निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परीक्षा होणार नाही, तरीही त्याचे शुल्क शाळा आकारत असल्याची ...

शिक्षण निरीक्षकांचे मालाडच्या शाळेला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : परीक्षा होणार नाही, तरीही त्याचे शुल्क शाळा आकारत असल्याची तक्रार मालाडच्या एका शाळेविरोधात पालकांनी केली होती. त्यानुसार याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश शिक्षण निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना गुरुवारी (दि. ७) दिले.

मालाडमधील एका इंग्रजी माध्यमाची शाळा पालकांकडून परीक्षा शुल्क तसेच प्रयोगशाळा, वाचनालय, वायफाय सेवेसाठी शुल्क आकारत असल्याची तोंडी तक्रार फोनवर पालकांनी शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम विभाग कार्यालयाला केली होती. त्यानुसार शिक्षण निरीक्षकांनी याची दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापकांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे तसेच पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीने मान्य केलेले शुल्क पालकांना कळविण्यात यावे असे निर्देश दिले. सोबतच पालकांशी सुसंवाद साधत शाळा कर्मचाऱ्यांनी पालकांशी सभ्यतेने वागून त्यांच्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यास सांगितले. त्यामुळे पालकांनी शिक्षण विभागाचे आभार मानले.