Join us  

रस्ता जमिनीवरून बनवा नाही तर जमिनीखालून; नॅशनल पार्कला हाती नाही लावायचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:08 AM

मुंबई : बोरीवली ते ठाणे आणि गोरेगाव ते मुलुंड असे दोन रस्ते प्रकल्प बोरीवली येथील राष्ट्रीय उद्यानाखालून भूमिगतरीत्या तयार ...

मुंबई : बोरीवली ते ठाणे आणि गोरेगाव ते मुलुंड असे दोन रस्ते प्रकल्प बोरीवली येथील राष्ट्रीय उद्यानाखालून भूमिगतरीत्या तयार करण्यात येणार असले तरी या दोन्ही प्रकल्पांना पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. कारण अशा प्रकल्पांमुळे उद्यानाला हानी पोहोचेल. केवळ उद्यान नाही तर वन्यप्राण्यांनादेखील याचा त्रास होईल. परिणामी, रस्ता जमिनीवरून बनवा नाही तर जमिनीखालून बनवा; पण नॅशनल पार्कला हात लावू नका, असे म्हणणे पर्यावरण अभ्यासकांनी मांडले आहे. याऐवजी पर्यायी रस्त्यांचा विचार करा, असे म्हणणे संबंधितांनी मांडले आहे.

२०१५ सालापासून गोरेगाव-मुलुंड रस्त्याची चर्चा सुरू आहे. आता घोषणा झाली तो बोरीवली ते ठाणे असा रस्ता आहे. हे दोन्ही रस्ते भूमिगत असून, ते उद्यानाखालून जात आहे. सूत्रांकडून माहितीनुसार, गोरेगाव-मुलुंडला अद्यापही केंद्राकडून परवानगी नाही. यात पर्यावरणीय मंजुरी हा प्रमुख मुद्दा आहे. बोरीवली ते ठाणे मार्गात कोणत्याही मंजुरीची आवश्यकता नाही. कारण हा महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्ता आहे. हे खूपच तांत्रिक आहे.

बोरीवली ते ठाणे असे काम करताना जंगलाची हानी होणार नाही, असा दावा केला जात आहे. येथे काम करताना कोणते तंत्रज्ञान वापरले जाणार आहे? याची माहिती पुरेशी दिली जात नाही. भूमिगत काम करताना जमिनीवर काम होणार की नाही? याची माहिती दिली जात नाही. मात्र, या कामादरम्यान याचा त्रास

येथील वन्यप्राण्यांना होईल. ध्वनी प्रदूषण होईल. वायू प्रदूषण होईल. वन्य प्राण्यांना त्रास झाला तर ते शहराकडे वळतील. सेव्ह आरे मूव्हमेंट पेड लगाओ पेड बचाओ प्रोजेक्टचे ऑर्गनायजर संजीव वल्सन यांनी सांगितले की, उद्यानाचा अर्थ काय? तर त्याचे संरक्षण केले पाहिजे. आपण त्याची हानी करत आहोत. यावर उपाय म्हणून आपण पर्यायी रस्त्यांचा वापर केला पाहिजे. पर्याय शोधला पाहिजे. आहे त्या रस्त्यांवर बेस्टसाठी वेगळी लेन ठेवली पाहिजे. बेस्ट बसची संख्या कमी करण्यापेक्षा बेस्टची संख्या वाढविली पाहिजे. ईस्ट-वेस्ट अशा रस्त्यांचा वापर केला पाहिजे. सार्वजनिक वाहतूक सेवेत वाढ केली पाहिजे.