शालेय पोषण कर्मचाºयांना स्थायी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:16 AM2017-08-03T02:16:04+5:302017-08-03T02:16:04+5:30

शालेय पोषण कर्मचाºयांना कायमस्वरूपी कामाची स्थायी आॅर्डर देऊन चपराशी कमकुक या पदावर नेमावे, या मागणीसाठी आयटक संलग्न शालेय पोषण

Make school nutrition staff permanent! | शालेय पोषण कर्मचाºयांना स्थायी करा!

शालेय पोषण कर्मचाºयांना स्थायी करा!

Next

मुंबई : शालेय पोषण कर्मचाºयांना कायमस्वरूपी कामाची स्थायी आॅर्डर देऊन चपराशी कमकुक या पदावर नेमावे, या मागणीसाठी आयटक संलग्न शालेय पोषण, स्वयंपाकी मदतनीस संघटनेने बुधवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. पोषण आहार कर्मचाºयांना किमान १८ हजार रुपये मानधन देण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
संघटनेने केलेल्या मागणीनुसार, केंद्र शासनाने प्रतिदिन ३५० रुपये देणाºया आदेशाची अंमलबजावणी करावी. शिवाय शालेय पोषण आहारासाठी कर्मचाºयांना इंधन स्वयंपाकी साहित्य शाळेतच उपलब्ध करून द्यावे. सध्या कर्मचाºयांना स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कामेही सांगितली जातात. जर इतर काम सांगितली, तर त्याचा मोबदलाही द्यावा. महत्त्वाची बाब म्हणजे, शासनाने राज्यातील स्वयंपाकी मदतनीस यांना कामावरून कमी केले आहे. त्या कर्मचाºयांना पूर्ववत कामावर घेण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
याआधी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय पोषण आहार कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासित केल्याचा दावा संघटनेने केला आहे. मात्र, अद्याप आश्वासनावर अंमलबजावणी झाली नसल्याची खंत संघटनेने बोलून दाखवली.

Web Title: Make school nutrition staff permanent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.