चाक निखळल्याची खात्री करण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:06 AM2021-05-09T04:06:20+5:302021-05-09T04:06:20+5:30

चाक निखळल्याची खात्री करण्यासाठी विमान आणले १०० फुटांपर्यंत खाली डीजीसीए करणार चाैकशी; तांत्रिक बिघाडाबाबत अलर्ट देणारी यंत्रणा नसल्याचा संशय ...

To make sure the wheel slips | चाक निखळल्याची खात्री करण्यासाठी

चाक निखळल्याची खात्री करण्यासाठी

Next

चाक निखळल्याची खात्री करण्यासाठी विमान आणले १०० फुटांपर्यंत खाली

डीजीसीए करणार चाैकशी; तांत्रिक बिघाडाबाबत अलर्ट देणारी यंत्रणा नसल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विमानतळावर गुरुवारी रात्री बेली लॅण्डिंग करण्यात आलेल्या बीचक्राफ्ट सी ९० या विमानाचे चाक खरेच निखळले आहे का, याची खात्री करण्यासाठी ते सुमारे १०० फुटांपर्यंत खाली आणल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यास वैमानिकांना अलर्ट करणारी यंत्रणा कार्यान्वित नव्हती का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक २७ वर हे विमान १०० फुटांपर्यंत खाली आणण्यात आले. त्या वेळी विमानतळावरील अधिकाऱ्यांनी संबंधित विमानाचा डावीकडील लॅण्डिंग गीअर गायब असल्याची माहिती वैमानिकाला दिली. त्यानंतरच विमानाचे बेली लॅण्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा अर्थ त्या विमानात तांत्रिक बिघाडाबाबत अलर्ट करणारी यंत्रणा कार्यान्वित नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या घटनेची संपूर्ण चौकशी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) केली जाणार आहे. हे विमान गुडगाव येथील जेट सर्व्ह एव्हीएशनच्या मालकीचे होते. विमानाची दुरुस्ती, देखभाल आणि हवाई सेवा पुरविण्याचे काम ही कंपनी करते. या घटनेमुळे ती डीजीसीएच्या रडारवर आली आहे.

..............................................

Web Title: To make sure the wheel slips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.