निकाल लागेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:06 AM2021-05-15T04:06:05+5:302021-05-15T04:06:05+5:30
राजेंद्र गवई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेपर्यंत पदोन्नतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आरक्षण द्यावे ...
राजेंद्र गवई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेपर्यंत पदोन्नतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आरक्षण द्यावे किंवा पदोन्नतीतील आरक्षित पदे रिक्त ठेवावीत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते राजेंद्र गवई यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
राज्य सरकारने अलीकडेच पदोन्नतीत मागासवर्गीयांना आरक्षण न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजात असंतोष निर्माण झाला असल्याचे राजेंद्र गवई यांनी सांगितले. या सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेपर्यंत तात्पुरती पदोन्नती द्यावी किंवा पदोन्नतीतील आरक्षित पदे रिक्त ठेवावीत, अशी मागणी केली आहे. जेंव्हा सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नावर अंतिम निकाल येईल तो आमच्यासाठी सर्वतोपरी असेल, असे गवई म्हणाले. या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असल्याचे गवई म्हणाले. या पक्षांना, सरकारला मागासवर्गीयांची मते हवीत, पण त्यांना आरक्षण द्यायला नको, अशी सरकारबद्दल समाजात भावना झाली आहे. त्यामुळे या सर्व नेत्यांना भेटून पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करणार असल्याचे गवई म्हणाले.
.............................................