धनंजय मुंडे, बालाजी तांदळेंसह दहा जणांना सह आरोपी करा; अंजली दमानियांची मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 10:47 IST2025-03-10T10:46:57+5:302025-03-10T10:47:46+5:30
Anjali Damania : समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यासह अन्य दहा जणांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.

धनंजय मुंडे, बालाजी तांदळेंसह दहा जणांना सह आरोपी करा; अंजली दमानियांची मोठी मागणी
Anjali Damania ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रात वाल्मीक कराड याचे मुख्य आरोपी असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, आता समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आमदार धनंजय मुंडे, बालाजी तांदेळे यांच्यासह अन्य दहा जणांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे.
माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! या पक्षात प्रवेश करणार
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. अंजली दमानिया म्हणाल्या, बालीजी तांदळेला हा पोलिसांसोबत शोध घेत होता. हे प्रकरण ज्यावेळी वाढत होतं त्यावेळी बालाजी तांदळे यांना दोघांना अटक करुन हे प्रकरण तिथल्या तिथे मिटवा, वाल्मीक कराड याच्यापर्यंत येऊ देऊ नका याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते, असा दावा दमानिया यांनी केला.
....यांना सहआरोपी करा
यावेळी अंजली दमानिया यांनी पोलिसांनी बालाजी तांदळे यांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवले. पहिल्याच दिवसापासून बालाजी तांदळे पोलिसांसोबत फिरत होते. पण, त्यांना लेटर १५ तारखेला दिले होते. पण, कोणते पोलीस आरोपीच्या मित्राची गाडी आरोपीला तपासण्यासाठी वापरतात? यावर पोलिसांवर धनंजय मुंडे यांचा दबाव होता का? तर बालाजी तांदळे यांनी देशमुख कुटुंबीयांना असं सांगितकलं की पोलिसांनी या आरोपीला पकडलेलं नाही, आम्ही गाड्या फिरवून पकडले आहे. म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकले जावे आपल्याकडे येऊ नये, यामुळे आता सगळ्यांनाच सहआरोपी करा, अशी मागमी अंजली दमानिया यांनी केली.
माझी मागणी धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉ. वायबसे व त्यांच्या पत्नी, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार, एलसीबीचे गित्ते या सर्वांना सहआरोपी करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.