लाईक केलेल्या पोस्टबद्दल लेखी खुलासा करा; सोमय्या स्कुल व्यवस्थापनाची प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस
By रेश्मा शिवडेकर | Published: May 4, 2024 11:21 PM2024-05-04T23:21:18+5:302024-05-04T23:21:58+5:30
शेख यांनी केलेल्या पोस्टविषयी एका ऑनलाईन पोर्टलवर २४ एप्रिलला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. आता आपल्या कृतीचा खुलासा करावा. अन्यथा त्यांच्यावर कारवाई का करू नये, अशी लेखी विचारणा करणारी नोटीस व्यवस्थापनाने शेख यांना पाठविली आहे.
मुंबई - हमास या पॅलेस्टाईनवादी संघटनेच्या समर्थनार्थ समाजमाध्यमांवरील काही पोस्टना लाईक केल्याबद्दल विद्याविहार येथील दि सोमय्या स्कुलच्या प्राचार्य परवीन शेख यांना व्यवस्थापनाने लेखी खुलासा करण्यास सांगितले आहे.
शेख यांनी केलेल्या पोस्टविषयी एका ऑनलाईन पोर्टलवर २४ एप्रिलला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. आता आपल्या कृतीचा खुलासा करावा. अन्यथा त्यांच्यावर कारवाई का करू नये, अशी लेखी विचारणा करणारी नोटीस व्यवस्थापनाने शेख यांना पाठविली आहे.
इस्त्रायलमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या हमास या संघटनेविषयी शेख यांना सहानभुती आहे, तसेच त्या हिंदूविरोधी आहेत, इस्लामवादी उमर खलिदविषयी सहानुभूती बाळगत आहेत, असा आक्षेप संबंधित ऑनलाईन पोर्टलमधील लिखाणात घेण्यात आला होता. त्यांनी गेल्या काही दिवसांत एक्स या समाजमाध्यमावर लाईक केलेल्या पोस्टच्या आधारे हा आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर व्यवस्थापनाने त्यांना जाब विचारला आहे.