Join us

२६/११ हल्ल्यासाठी वापरलेल्या बोटीचा मेकओव्हर, नवीन नाव

By admin | Published: February 21, 2016 3:49 PM

२६ /११ हल्ल्याच्या आठवणी मुंबईकरांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. पण कुबेर बोटीचे मालक हिरालाल मसानी यांनी या आठवणी मागे सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २१-  मुंबईवरील २६ /११  दहशतवादी हल्ल्याला सात वर्ष उलटली असली  तरी, आजही  मुंबईकरांच्या मनात या हल्ल्याच्या आठवणी ताज्या आहेत. पण कुबेर बोटीचे मालक हिरालाल मसानी यांनी या आठवणी मागे सोडून आता पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. 
अजमल कसाब आणि त्याचे नऊ अतिरेकी याच कुबेर बोटीचे अपहरण करुन समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार पोरबंदर स्थित उद्योगपती हिरालाल मसानी त्या २६ /११ च्या कटू आठवणी पुसण्यासाठी फक्त कुबेरचा चेहरामोहराच बदलणार नसून, त्यांनी कुबेरचे नाव बदलून श्री गणेश कुबेर असे नवीन नाव दिले आहे. 
श्री गणेश हे भाग्याचे प्रतीक आहे, वाईट शक्ती बोटीपासून दूर रहाव्यात यासाठी मी कुबेरचे नाव बदलले असे मसानी यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले. मागच्या आठवडयात पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने अतिरेक्यांनी मुंबईत शिरण्यासाठी वापरलेली बोट केसची संपत्ती करण्याचे आदेश दिले आहेत. 
पाकिस्तानला बोट देणार ? या प्रश्नावर मसानी म्हणाले की, मी वर्तमानपत्रात पाकिस्तानी कोर्टाच्या आदेशाबद्दल वाचले आहे पण, भारतीय यंत्रणांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर याबद्दल निर्णय घेईन असे मसानी यांनी सांगितले.