लीनल गावडे, मुंबईनवरात्रींच्या दिवसात फॅशनचे नवनवे ट्रेंड येत असतात. मग ते कपड्यांचे असो किंवा ज्वेलरींचे यात आणखी एक भर असते ती मेकअपची. आऊटफिटला साजेसा मेकअप करण्यासाठी या दिवसांत पार्लरमध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशावेळी तरुण पिढी आणि महिला वर्गांना आकर्षित करण्यासाठी पालर्स सर्रास नवरात्रीसाठी स्पेशल ‘पॅकेजेस’ काढतात.मेकअप आणि हेअर स्टाईलससाठीचे हे पॅकेजेस साधारणत: ५०० रुपयांपासून सुरु होते. बेसिक मेकअपपासून ते विविध हेअरस्टाईल्सचा समावेश या पॅकेजेसमध्ये होतो. हेअरस्टाईलचा विचार करता यंदा वेणीच्या विविध प्रकारांना मागणी आहे. खजुरी चोटी,सागर वेणी, पाचपेढ्याची-तीनपेढ्यांची- सातपेढ्यांची वेणी अशा वेणींच्या प्रकारांचा यात समावेश आहे. त्यावर लावण्यासाठी विविध प्रकाराची आणि रंगसंगतीतली हेअर ब्रॉचेंस सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. दादर, मस्जिद, भुलेश्वर या ठिकाणी हे ब्रॉचेस १५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत मिळतात. यंदा वॉटरप्रुफ मेकअपला जास्त मागणी आहे. या दिवसांत हेव्ही मेकअपची मागणी तितकीशी नसते. त्यामुळे केशरचनेवर अधिक भर दिला जातो. पण सिंपल अॅण्ड लाँगलास्टिंग मेकअपसाठी मात्र अनेक जणी पार्लरला पसंती देतात.यासोबतच मेहंदीची सुद्धा मागणी या दिवसात असते. अरेबिक, दुल्हन या प्रकाराच्या मेहंदी हातावर काढल्या जातात. झटपट मेहंदी काढणाऱ्या राजस्थानी मेंहदीवाल्यांकडे तरुणींची गर्दी$ आहे. स्मज फ्री मेकअपसाठीच्या विविध प्रोडक्टची खरेदी देखील या दिवसांत जास्त होत आहेत .या मेकअप आणि केशरचनेशिवाय टॅटूची क्रेझ देखील आहे. हॅन्ड पेंटेड टॅटू या दिवसात जास्त काढले जातात. प्रत्येक दिवशी वेगवेगळे टॅटू काढण्यासाठी अनेक टॅटू पार्लर वेगवेगळे पॅटर्न या दिवसात घेउन येतात. रासगरबा खेळणारी जोडी, फ्लोरल प्रिंट तसेच सामाजिक संदेश देणारे टॅटू असे कैक प्रकार त्यात असतात.वॉटरप्रुफ रंगाचा वापर यात केला जातो.हे रंग साबणाने सहज निघतात आणि कोणतीही अॅलर्जी सहसा होत नाही. म्हणूनच असे टॅटू काढून घेण्यावर तरुणी अधिक भर देतात. पण हे टॅटू चांगल्या दुकानातूनच काढून घ्यावेत. (प्रतिनिधी)
मेकअपच्या पॅकेजला तरूणाईची पसंती!
By admin | Published: October 13, 2015 2:32 AM