मर्चंट नेव्ही ऑफिसरने धडक देत फरफटत नेलं; मालाडमध्ये २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 12:53 PM2024-09-04T12:53:36+5:302024-09-04T12:56:41+5:30

मालाडमध्ये भरधाव आलिशान कारने धडक दिल्याने एका २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Malad 27 year old woman returning from Mehndi class was hit by car | मर्चंट नेव्ही ऑफिसरने धडक देत फरफटत नेलं; मालाडमध्ये २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मर्चंट नेव्ही ऑफिसरने धडक देत फरफटत नेलं; मालाडमध्ये २७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Malad Accident : मुंबई पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.मालाडमध्ये भरधाव कारने धडक दिल्याने एका २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.  भरधाव वेगाने येणाऱ्या फोर्ड कारच्या धडकेत मेहंदी क्लासवरुन घरी परतणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अनुज सिन्हा याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी आहे. धक्कादायक बाब म्हणजे  आरोपीने महिलेला धडक दिल्यानंतर डिव्हायडरपर्यंत फरफटत नेलं होतं. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. जमावाने आरोपीला गाडीतून बाहेर काढत चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं.

काही दिवसांपूर्वी घडलेले वरळी हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एका भीषण घटनेनं मुंबई हादरली आहे. मालाडमध्ये मंगळवारी रात्र वर्दळीच्या रस्त्यावर फोर्ड चालकाने महिलेला धडक देत फरफटत नेलं. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर नागरिकांनी कारचालकाला बेदम मारहाण केली. यामुळे कारचालकही जखमी झाला आहे. त्यानंतर संतप्त जमावानं गाडीचीही तोडफोड केली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय शहाना काझी ही मेहंदीचा क्लास देऊन नेहमीप्रमाणे घरी येत होती. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने शहाना काझीला जोरदार धडक दिली आणि तिला डिव्हायडरपर्यंत फरफटत नेलं. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली होत. घटनेनंतर संतप्त लोकांनी आरोपींना बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी चालकानंच जखमी महिलेला रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मालाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

कार चालक अनुज सिन्हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो आणि सुट्टीवर त्याच्या घरी होता. अपघातानंतर तिथल्या काही लोकांच्या मदतीने त्याने जखमी महिलेला शहाना काझीला जवळच्या रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मयत शहाना दोन लहान मुले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी अनुजला अटक केली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले असून त्याने मद्यपान केले होते की नाही हे समोर येणार आहे. शहानाच्या पतीच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम २८१, २८५, १०५ आणि १८४, १८५ एमव्हीए अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 

Web Title: Malad 27 year old woman returning from Mehndi class was hit by car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.