मालाड शिक्षिका लिफ्ट अपघातप्रकरण; शाळेच्या प्रशासकासह तिघांना अटक

By गौरी टेंबकर | Published: October 19, 2022 11:28 PM2022-10-19T23:28:35+5:302022-10-19T23:29:27+5:30

मालाड पश्चिमेकडील चिंचोली बंदर येथील सेंट मेरीज इंग्लिश हायस्कूलमधील लिफ्ट अपघातात  सहाय्यक  शिक्षक जेनेल बोनिफेस फर्नांडिस (२६) यांच मृत्यू झाला होता.

malad teacher lift accident case three arrested including the school administrator | मालाड शिक्षिका लिफ्ट अपघातप्रकरण; शाळेच्या प्रशासकासह तिघांना अटक

मालाड शिक्षिका लिफ्ट अपघातप्रकरण; शाळेच्या प्रशासकासह तिघांना अटक

googlenewsNext

मुंबई:

मालाड पश्चिमेकडील चिंचोली बंदर येथील सेंट मेरीज इंग्लिश हायस्कूलमधील लिफ्ट अपघातात  सहाय्यक  शिक्षक जेनेल बोनिफेस फर्नांडिस (२६) यांच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी मालाड पोलिसांनी बुधवारी तीन आरोपींना अटक केली ज्यात शाळा प्रशासकाचाही समावेश आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील कर्मचार्‍यांची चौकशी केल्यानंतर लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होता, त्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले होते. तपासादरम्यान पोलिसांना.आढळले की शाळेचे प्रशासक जॉन्सन जॉन (५६),  देखभाल कंत्राटदार सुशीलकुमार चौधरी (५७), आणि मदतनीस राजाराम राणे (५९) यांना या बिघडाची पूर्ण माहिती होती. मात्र त्यांनी निष्काळजपणा केला आणि त्यावर वेळेवर कारवाई करण्यात आली नाही. ज्यात अखेर फर्नांडिस यांना जीव गमवावा लागला. त्यानुसार मालाड पोलिसांनी बुधवारी या  आरोपींना अटक केली. त्यांना बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले असता या सर्वांची रवानगी न्यायालयीम कोठडीत करण्यात आली आहे. 

अपघाताच्या दिवशी म्हणजे १६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सहाव्या मजल्यावर जाण्यासाठी शिक्षिकेने जेव्हा लिफ्टचे बटण दाबले तेव्हा लिफ्ट आली आणि दरवाजाच्या स्वयंचलित सेन्सरमुळे ती उघडली. शिक्षिकेने लिफ्टच्या केबिनमध्ये पाऊल ठेवले. मात्र अयोग्य देखभालीमुळे लिफ्टच्या तारा झीजल्या होत्या. परिणामी खाली जाणाऱ्या सामूहिक लिफ्टच्या यंत्रणेने दरवाजा बंद होण्याची वाट पाहिली नाही आणि दरवाजाचे सेन्सर कार्यरत असतानाही लिफ्ट वरच्या दिशेने जाऊ लागली.त्यानुसार मालाड पोलिसांनी  ठाण्यातील क्लासिक लिफ्टच्या मालकावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: malad teacher lift accident case three arrested including the school administrator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई