मालाडमध्ये घरांवरील दगडफेकीचे सत्र सुरूच

By Admin | Published: May 29, 2017 07:02 AM2017-05-29T07:02:14+5:302017-05-29T07:02:14+5:30

मालाड (पूर्व) येथील नवजाला पाडा येथील घरांवर गेल्या आठवड्यापासून रात्रीबेरात्री दगड, विटा आणि बाटल्या फेकण्याचे प्रकार अद्यापही

In Malad, there was a rioting in the house | मालाडमध्ये घरांवरील दगडफेकीचे सत्र सुरूच

मालाडमध्ये घरांवरील दगडफेकीचे सत्र सुरूच

googlenewsNext

मुंबई : मालाड (पूर्व) येथील नवजाला पाडा येथील घरांवर गेल्या आठवड्यापासून रात्रीबेरात्री दगड, विटा आणि बाटल्या फेकण्याचे प्रकार अद्यापही सुरू असून नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. याबाबत दिंंडोशी पोलिसांनी आणखी दोन गुन्हे दाखल केले असून समाजकंटकांवर नियंत्रण राहिले नसल्याबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
येथील शंकर महादेव चाळ आणि अरुणोदय निवास येथे गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाल्याने नागरिकांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार केली. १३ मे रोजी नागरिकांनी या परिसरात पाळत ठेवली असता एक तरुण मध्यरात्री दोन वाजता विटेचे तुकडे फेकताना आढळला. नागरिकांनी त्याला पकडून विचारणा केली असता आपले नाव प्रेम परेश शाह असल्याचे त्याने सांगितले. मात्र तो लगेच पळून गेला. पोलिसांनी भादंवि ३३६ अन्वये प्रेम परेश शहाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले. मात्र त्यानंतरही २३ मे रोजी एक इसम अशाच हल्ल्यात जखमी झाला. पाठोपाठ शनिवारी समाजकंटकांकडून फेकण्यात आलेल्या बाटलीमुळे एक गर्भवती महिला जखमी झाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने दाखल गुन्ह्यांची संख्या चारवर पोहोचली आहे.
सातत्याने असे प्रकार घडूनही पोलीस त्यावर नियंत्रण मिळवू शकत नसल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगत राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी पोलीस आयुक्त, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी केवळ भादंवि ३३६ अन्वये गुन्हा दाखल न करता भादंवि ३३८ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल करायला हवा, असेही मोहन कृष्णन यांनी सांगितले.

Web Title: In Malad, there was a rioting in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.