Malad Wall Collapse: ...अन् मृत्यूसोबतची 12 तासांची झुंज अपयशी ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 09:25 AM2019-07-03T09:25:52+5:302019-07-03T09:28:16+5:30
मालाड दुर्घटनेत 12 वर्षांच्या दीपाचा मृत्यू
मुंबई: मालाडमध्ये भिंत कोसळल्यानं 22 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 वर्षांच्या दीपा ननावरेचा करुण अंत झाला. दीपानं तब्बल 12 तास मृत्यूशी झुंज दिली. ढिगाऱ्याच्या अडकलेली दीपा जीवाच्या आकांताने ‘मला इथून बाहेर काढा’ असे सातत्याने सांगत विव्हळत होती. सोमवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दीपाला जवळपास १२ तासांनी बाहेर काढण्यात यश आले. घटनास्थळी डॉक्टरांनी तिला त्वरित उपचार केले, मात्र तिला वाचवण्यात यश आले नाही, अखेर तिची मृत्यूशी झुंज संपुष्टात आली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की, तिचे पाय मातीच्या ढिगाºयाखाली खूप काळासाठी अडकले होते. तिचा जीव वाचविण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले, मात्र डॉक्टरांना यश आले नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता बराच काळ मदतीसाठी रडत हाका मारत होती, परंतु तिला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी वेळ लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
च्या दुर्घटनेत संपूर्ण ननावरे कुटुंबीयांवरच काळाने घाला घातला असून या अपघातात दीपाचे वडील लक्ष्मण ननावरे (४०), आई राणी ननावरे (३५) आणि लहान भाऊ परशुराम ननावरे (४) यांना जीव गमवावा लागला, अशी माहिती उपनगरीय रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. राजेश बच्छाव यांनी दिली.