Join us  

मलालाच्या पुस्तकाची चलती

By admin | Published: October 12, 2014 12:58 AM

मलाला युसुफझई या लढवय्या मुलीला शुक्रवारी नोबेल पुरस्कार जाहीर झाला. यानंतर तिने लिहिलेल्या ‘आय एम मलाला’ या पुस्तकाची मागणी वाढू लागली आहे.

भक्ती सोमण - मुंबई
मलाला युसुफझई या लढवय्या मुलीला शुक्रवारी नोबेल पुरस्कार जाहीर झाला. यानंतर तिने लिहिलेल्या ‘आय एम मलाला’ या पुस्तकाची मागणी वाढू लागली आहे. कालच्या दिवसात या पुस्तकाचे कुतूहल वाढल्याने या पुस्तकाची मागणी वाढली आहे. या पुस्तकासाठी मॅजेस्टिक बुक डेपोसह इतर प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे हे पुस्तक विकत घेणा:यांची गर्दी वाढू लागली आहे. 
पाकिस्तानातल्या स्वात खो:यातील तालिबानी राजवटीविरुद्ध आवाज उठवणा:या, आणि मुलींच्या शिक्षणाला वाहून घेतलेल्या मलालाने तिचा 17 वर्षाचा प्रवास ‘आय एम मलाला’ या पुस्तकातून शब्दबद्ध केला. या पुस्तकाने बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीतही अल्पावधीत स्थान मिळवले. शुक्रवारी मलालाला नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मलालासह तिच्या पुस्तकाचीही चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. 
‘आय एम मलाला’ हे मलालाचे इंग्रजी आत्मचरित्र आणि तिने उर्दू भाषेत लिहिलेल्या डायरीचा मराठीत अनुवाद करून तिच्या काही आठवणीही संजय मेश्रम यांनी ‘सलाम मलाला’ या पुस्तकातून मराठीत आणल्या. मलालाला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर गिरगाव, दादर, ठाणो येथील मॅजेस्टिक बुक डेपोमध्ये या पुस्तकाच्या विक्रीत वाढ झाल्याचे मॅजेस्टिक प्रकाशनच्या आशय कोठावळे यांनी सांगितले. तर ज्या लोकांचा वाचनाकडे ओढा नाही तेही मलालाच्या पुस्तकाची मागणी करीत असल्याने पुस्तकाला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे मनोविकास प्रकाशनच्या अरविंद पाटकर यांनी सांगितले.
 
मुस्लीम मुलींना आकर्षण जास्त
मलालाविषयी सगळ्याच थरातील 
लोकांना आकर्षण वाढले असल्यास 
नवल नाही. पण आता मुस्लीम मुलींनाही ती आपले रोल मॉडेल वाटत आहे. तिच्या पुस्तकांची मागणी करणा:या फोनमध्ये मुस्लीम मुली आघाडीवर असल्याचे अरविंद पाटकर यांनी सांगितले.