मुंबई : शहरात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी पावसाळा आजाराचे प्रमाण वाढत असतानाचे चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने जुलै महिन्याची आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाळी आजाराच्या रुग्णसंख्येची माहिती दिली आहे. त्यामध्ये दोन महिन्यांची तुलना केली तर या महिन्यामध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पाऊस कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. या डबक्यामध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असते. त्या डासांमुळे मोठ्या प्रमाणात मलेरिया आणि डेंग्यूचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यामुळे पालिकेने सर्व परिसरात फवारणी सुरु केली आहे.
नागरिकांनाही पाण्याची छोटी डबकी असतील तर ती नष्ट करण्याचे आवाहन केले आहे. पावसाळी आजाराचे प्रमाण वाढत असले तरी फार कमी प्रमाणात रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते.
आजार जुलै ऑगस्ट (२७पर्यंत)मलेरिया ७२१ ९५९ लेप्टो ४१३ २६५ डेंग्यू ६८५ ७४२ गॅस्ट्रो १,७६७ ८१९ हेपेटायटिस १४४ ७७ चिकुनगुनिया २७ ३४ एच १ एन १ १०६ १०८