- नितीन जगतापमुंबई - पश्चिम रेल्वेच्या वांद्रे ते खार रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मंगळवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पश्चिम रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्याचा फटका घरी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना बसला.
पश्चिम रेल्वेच्या वांद्रे ते खार रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेला आहे. हा बिघाड मंगळवारी रात्री ११.१० वाजताच्या सुमारास झाल्याने सांताक्रुज ते वांद्रे रेल्वे स्थानका दरम्यानची लोकल वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली. परिणामी लोकलच्या एका मागोमाग एक रांगा लागल्याने गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे लोकल गाड्यामध्ये प्रवासी अडकून पडले होते. या घटनेची माहितीने मिळताच पश्चिम रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल झाले. सिग्नल बिघाड दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. या सिग्नल यंत्रणेत बिघाडीमुळे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वाढवण्यात आल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे दादर वांद्रे आणि मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली आहे.