‘कुपोषणाचा सामना युद्धपातळीवर करावा’

By admin | Published: September 29, 2016 03:23 AM2016-09-29T03:23:25+5:302016-09-29T03:23:25+5:30

कुपोषण आणि बालमृत्यूच्या घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यासाठी युद्धपातळीवर प्राधान्य क्र माने काम करावे लागेल, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी

'Malfunction should be fought on the war-footing' | ‘कुपोषणाचा सामना युद्धपातळीवर करावा’

‘कुपोषणाचा सामना युद्धपातळीवर करावा’

Next

मोखाडा : कुपोषण आणि बालमृत्यूच्या घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यासाठी युद्धपातळीवर प्राधान्य क्र माने काम करावे लागेल, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी व्यक्त केले. श्रमजीवी संघटना आणि समर्थन संस्थेच्या शिष्टमंडळासोबत राजभवनावर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सरकारसोबत संस्था-संघटनांनीही या मोहिमेत सहभागी व्हायला हवे, असेही ते म्हणाले. कुपोषण आणि दारिद्रय निर्मूलनासाठी संघटना सरकारला आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन विवेक पंडित यांनी या वेळी राज्यपालांना दिले.
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेले बालमृत्यू आणि कुपोषणाच्या प्रश्नावर गेले अनेक दिवस श्रमजीवी संघटना सातत्याने आंदोलन करत आहे. सोबतच कुपोषण निर्मूलनाची मोहीम राबवून स्वयंसेवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य शिबिरदेखील घेत आहे. कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय असतानाही सरकार यासाठी ठोस उपाययोजना करत नसल्याने श्रमजीवी संघटनेने या प्रश्नावर रान उठवले होते. विवेक पंडित यांनी राज्यपालांचे लक्ष या प्रश्नावर वेधले होते. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी राजभवनात राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासोबत श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांचे सचिव अशी बैठक पार पाडली.
सुमारे एक तास चाललेल्या बैठकीत खूप सकारात्मक चर्चा झाली. कुपोषण हे गंभीर संकट असून त्याविरोधात युद्धपातळीवर लढायला हवे, असे मत व्यक्त करत तुम्ही याबाबत सक्षम उपाय सुचवावा, असेही राज्यपालांनी शिष्टमंडळाला सांगितले. विवेक पंडित यांनी कुपोषणाचा संबंध रोजगार आणि दरिद्रयाशी असल्याचे स्पष्ट करत यावर तत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना काय आणि कशा असाव्यात, याचा संपूर्ण तपशील राज्यपालांसमोर मांडला.
या शिष्टमंडळात श्रमजीवी आणि समर्थनचे संस्थापक विवेक पंडित, बाळाराम भोईर, विजय जाधव,
दत्तू कोळेकर, सुरेश रेंजड, अशोक सापटे, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, रूपेश कीर, सरिता जाधव, पांडुरंग मालक, संतोष धिंडा, विलास
सुरवसे आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी, डॉ. गोपाळ कडवेकर, डॉ. आशीष भोसले, डॉ. वर्षा भोसले,
डॉ. मोहन ढुधाट हे देखील उपस्थित होते. (वार्ताहर)

विठ्ठल मूर्तीची भेट
राज्यभरातील प्रशासकीय अनुशेष आणि पालघर या नवनिर्मित जिल्ह्याच्या रिक्त पदे, समस्या आणि सरकारी अनास्थेबाबत आकडेवारीसह पूर्ण लेखाजोखा पंडित यांनी राज्यपालांसमोर मांडला.
राज्यपालांनी अत्यंत संवेदनशीलतेने सर्व मुद्यावर तपशीलवार चर्चा करून याबत सर्वसमावेशक आराखडा करणार आल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. तसे निर्देशही त्याच्या सचिवांना दिले. या वेळी विवेक पंडित यांनी राज्यपालांना श्री विठ्ठलाची मूर्ती आणि रोपे भेट दिली.

Web Title: 'Malfunction should be fought on the war-footing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.