Join us  

मल्हार बाय द बे : सेंट झेवियर्सच्या ‘मल्हार’ फेस्टीवलला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 10:51 PM

सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या ‘मल्हार’ फेस्टीवलला जोरदार सुरुवात झाली असून येणाऱ्या दिवसात आणखी जबरदस्त असे इवेंटस् असणार आहेत

Malhar at St. Xavier’s College : सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या भव्य अशा‘मल्हार’ फेस्टीवलच्या निमित्ताने सध्या बरेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. मल्हार बाय द बे हा मल्हार फेस्टीव्हलचा अविभाज्य भाग आहे. ६ ऑगस्ट २०२४ रोजी, या वर्षीचा मल्हार बाय द बे हा इवेंट अँटीसोशल, लोअर परेल, मुंबई येथे पार पडला आणि खरोखरच याला जबरदस्त असा प्रतिसाद मिळाला. हा इवेंट जियो सावन आणि फुर्तादोस यांच्याकडून प्रस्तुत करण्यात आला.

या वर्षीच्या ‘मल्हार’ फेस्टीवलची थीम ‘विवा ला विडा’ याच्याशी निगडित आहे. ज्याचा अर्थ तो व्यक्तींना त्यांच्या क्षमतेचा उपयोग करण्यास आणि त्यांच्या प्रतिभा बाहेर आणण्यासाठी प्रोत्साहित करतो असा आहे.  मल्हारच्या सदस्य आणि सर्वच जण हे आनंद आणि आशा, संगीत आणि उत्साहाने भरलेल्या या  इवेंटच्या अद्भुत संध्याकाळची वाट पाहत होते. रात्री प्रचंड गर्दी झाली आणि विद्यार्थ्यांनी स्टेजवर आपली अप्रतिम प्रतिभेने सर्वांची मने जिंकली. 

सेंट झेवियर्सच्या विद्यार्थ्यांसह या वर्षी फेस्टीवलमध्ये मल्टीटॅलेंटेड सेलेब्रिटी पार्थ समथान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता. पार्थ हा एक भारतीय टेलिव्हिजन स्टार आहे जो ‘कैसी ये यारियां’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ मधील त्यांच्या कामासाठी ओळखला जातो. तो लवकरच 'घुडचडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यावेळी पार्थने आपल्या डान्स परफॉमन्सने विद्यार्थ्यांचे जबरदस्त मनोरंजन केले आणि त्यांच्याशी संवादही साधला. याशिवाय द ट्रेबलमेकर्स या सदाबहार कलाकारांनीही विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले आणि उत्साह कायम ठेवला.

या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना भुरळ घातली आणि त्यानंतर बँड परफॉर्मन्स, रॅप, फ्रीस्टाइल, स्लॅम कविता आणि स्टँड अप कॉमेडी यासह इतर विविध परफॉर्मन्सचा समावेश होता. सगळे कलाकार प्रेक्षकांमध्ये हरवून गेले होते. दुसरीकडे फोटोबूथच्या उत्तम सेटने गर्दीचा उत्साह आणखी वाढवला आणि रात्रीच्या वातावरणात आणखी भर घातली. प्रेक्षकांसाठी एक नेत्रदीपक परफॉर्मन्स आणि मल्हार बाय द बेच्या रात्रींच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या फोटोबूथसोबत या कार्यक्रमाची सांगता झाली.

सेंट झेवियर्स कॉलेजच्या गतिमान भावनेचे दर्शन घडवणारा मल्हार हा भव्य सोहळा असणार आहे. अशा रोमांचक सुरुवातीमुळे आगामी इवेंटची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. अधिक अपडेट्ससाठी संपर्कात राहा आणि १५, १६ आणि १७ ऑगस्ट रोजी मल्हार येथे लाइफ सेलिब्रेट करण्यात आमच्यासोबत सामील व्हा, असे आवाहन मल्हारकडून करण्यात आलंय.

टॅग्स :मुंबईमहाविद्यालय