मुंबईतील महाविद्यालयांच्या फेस्टिव्हल्समधला मोठा फेस्टिव्हल मल्हार २ वर्षाच्या गॅपनंतर धडाक्यात परतला आणि साजरा झाला. २८ आणि २९ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या यंदाच्या मल्हारची थीम अरोरा : ट्रान्ससँडिंग होरायझन्स अशी होती. केवळ झेविअर्स नाही, तर मुंबईच्या इतर महाविद्यालयातील पार पडलेल्या मल्हारवारीत दोन वर्षांच्या कालावधीनंतर, अनेक उत्साही सहभागी आणि अत्यंत उत्साही प्रेक्षकांसह मल्हार यशस्वी पणे पार पडला.
पहिल्याच दिवशीच्या कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थित प्रसिद्ध वक्त्यांनी विविध ज्ञानवर्धक विषयांवर मते व्यक्त करीत विद्यार्थ्यांची मते जिंकली. या प्रसिद्ध वक्त्यांमध्ये बेझवाड़ा विल्सन ज्यांनी आपला आवाज कसा वापरावा मदत करायला याची माहिती दिली तर पालकी शर्मानी पत्रकारितेत निष्पक्षता कशी महत्त्वाची याची माहिती दिली. डॉ. विदिता वैद्य यांनी मनोविकारआणि त्यासंदर्भातील ज्ञान याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर सिद्धार्थ पॉल तिवारी यांनी तंत्रज्ञान आपल्याला कशी मदत करतेयाची माहिती दिली. ध्रुव सेहगल यांनी चित्रपट निर्मिती आणि व्यक्तिरेखा विकासाबद्दल विद्यार्थ्यांना कानमंत्र दिले तर कामाक्षी आणि विशाला खुराना यांनी संगीताने त्यांना कशी मदत केली याबद्दल चर्चा केली.
याशिवाय परमेश शहानी, सोनल ग्यानी, शंभू चाको, आलोक हिसारवाला गुप्ता आणि अँजेलिक जॅकेट,निखिल परळीकर यांनी आपापल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना स्वतःकडे आकर्षित करीत त्यांची मने जिंकली.
मल्हारच्या साहित्य कला व ललित कला विभागाने २८ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध मनोगत स्पर्धांचे आयोजन केले होते. याव्यतिरिक्त त्यांनी एक आकर्षक कला आणि पुस्तक विश्रामगृहाची व्यवस्था केली होती. २९ ऑगस्ट रोजी मल्हारच्या विविध कला विभागांनी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, बॉलीवूड फ्रीस्टाईल नृत्य, थिएटर, पथनाट्य, युगल गायन, रॅप बॅटल, बैंड, डीजे आणि व्यक्तिमत्व यांचा समावेश होता.
स्पर्धकांच्या परफॉर्मन्समध्ये नावीन्य, मौलिकता, वेगळेपण होते, उत्साह होता. याच उत्साहात ‘मल्हार’ २ दिवस धडाक्यात पार पडला.