Join us

मल्लिक्कार्जुन पुजारी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाण्याचे राजकीय नेते मल्लिकार्जुन पुजारी यांच्याविरोधात टी-सिरीज या म्युझिक कंपनीचे मालक भूषण कुमार यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ठाण्याचे राजकीय नेते मल्लिकार्जुन पुजारी यांच्याविरोधात टी-सिरीज या म्युझिक कंपनीचे मालक भूषण कुमार यांनी खंडणी मागितल्याची तक्रार केली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविल्याने अटकेच्या भीतीने पुजारी यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने मंगळवारी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, एका अभिनेत्रीने कुमार यांची तक्रार पुजारी यांच्याकडे केली. त्यानंतर पुजारी यांनी कुमार यांना फोन करून तडजोड करण्यासाठी पैशाची मागणी केली आणि पैसे दिले नाही तर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याची धमकी कुमार यांना दिली.

कुमार यांनी यासंबंधी १ जुलै २०२१ रोजी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. हे प्रकरण अभिनेत्रीने कुमार यांच्याविरोधात १४ जुलै रोजी बलात्कार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यावर उघडकीस आले.

अभिनेत्रीने बलात्काराची तक्रार नोंदविल्यावर कुमार यांनी पुजारी यांच्यावर गुन्हा नोंदविला. पुजारी यांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला. मात्र, प्रत्यक्षात पैसे घेतले नाहीत. पुजारी यांनी अभिनेत्रीला मदत केली म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा युक्तिवाद पुजारी यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.

आपल्याला म्युझिक कंपनीच्या एका प्रकल्पात काम देण्याचे प्रलोभन दाखवून कुमार यांनी बलात्कार केल्याची तक्रार अभिनेत्रीने केली आहे; परंतु टी-सिरीजने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.