मोठी बातमी! मुंबईत मॉल्स, पब आणि स्टेशनमध्ये कोरोना चाचणीशिवाय प्रवेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 02:36 AM2021-03-19T02:36:12+5:302021-03-19T02:37:29+5:30

आयुक्तांनी चाचणी व लसीकरण वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मॉल्स, पब, व्यापारी संकुल, चित्रपटगृह, रेल्वेस्थानके, बसस्थानके आदी ठिकाणी प्रत्येकाची अँटिजन चाचणी करूनच प्रवेश दिला जावा, असेे निर्देश दिले आहेत.

Malls, pubs, stations in Mumbai do not have access without testing | मोठी बातमी! मुंबईत मॉल्स, पब आणि स्टेशनमध्ये कोरोना चाचणीशिवाय प्रवेश नाही

मोठी बातमी! मुंबईत मॉल्स, पब आणि स्टेशनमध्ये कोरोना चाचणीशिवाय प्रवेश नाही

Next

मुंबई: गर्दीवर नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने मॉल्स, पब आदी ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र या ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने यापुढे मॉल, पब, व्यापारी संकुल, लांब पल्ल्याची रेल्वेस्थानके एसटीची बसस्थानके आदी ठिकाणी अँटिजन चाचण्या केल्या जाणार आहेत, असे निर्देश मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

आयुक्तांनी चाचणी व लसीकरण वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मॉल्स, पब, व्यापारी संकुल, चित्रपटगृह, रेल्वेस्थानके, बसस्थानके आदी ठिकाणी प्रत्येकाची अँटिजन चाचणी करूनच प्रवेश दिला जावा, असेे निर्देश दिले आहेत. सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे  अशा चाचण्यांशिवाय मॉल्स, पब, रेल्वेस्थानके व बसस्थानकांमध्ये प्रवेश देऊ नये, असे आयुक्तांनी आरोग्य विभागासह विभाग कार्यालयांना बजावले आहे. 
 

Web Title: Malls, pubs, stations in Mumbai do not have access without testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.