मालवणीत आढळली कुपोषित मुलगी! 'चाइल्ड लाईन' एनजीओकडून मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 08:56 AM2022-03-20T08:56:47+5:302022-03-20T08:59:09+5:30

मालाडच्या मालवणी परिसरात एक कुपोषित मुलगी सापडल्याने खळबळ उडाली असून, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

malnourished girl found in malvani malad a helping hand from the child line ngo | मालवणीत आढळली कुपोषित मुलगी! 'चाइल्ड लाईन' एनजीओकडून मदतीचा हात

मालवणीत आढळली कुपोषित मुलगी! 'चाइल्ड लाईन' एनजीओकडून मदतीचा हात

googlenewsNext

गौरी टेंबकर – कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: मालाडच्या मालवणी परिसरात एक कुपोषित मुलगी सापडल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री हा प्रकार उघड झाला. या मुलीला 'चाइल्ड लाईन' आणि 'वंदे मातरम' या एनजीओ ने मदतीचा हात दिला आहे. जिच्यावर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मेहेर कुरेशी असे या कुपोषित बालिकेचे नाव असून ती मालवणीच्या गेट क्रमांक आठच्या जवळ असलेल्या आंबोजवाडी परिसरात सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत चाइल्ड लाईन या एनजीओला समजताच त्यांनी सदर मुलीला ताब्यात घेत उपचारासाठी वांद्रेच्या भाभा रुग्णालयात हलविले. त्यावेळी तिला ताप आला होता. त्यामुळे तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. मात्र दहा दिवस बाळाला सांभाळण्यासाठी फंड कमी पडत होता, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था वंदे मातरमचे सचिव फिरोज शेख यांनी पुढाकार घेत बाळासाठी आर्थिक सहाय्य मिळवून दिले. 

मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार बाळासाठी शेलटर उपलब्ध करण्यात आले. शेख यांनी 'लोकमत' ला दिलेल्या माहितीनुसार, सदर बाळाचे वडील हे कारागृहात शिक्षा भोगत आहेत. तर आईला नशेचे व्यसन आहे. त्यामुळे या बाळाकडे दुर्लक्ष झाले. याबाबत मला समजले तेव्हा माझ्याकडून होईल तितकी मदत मी पुरवली. बाळाला पुढे अन्न मिळावे याची देखील तरतुद मी करणार असुन आंबोजवाडी परिसरात भेट देत अशी अजुन काही प्रकरणे आहेत का? याचाही शोध घेणार असल्याचे शेख यांनी नमूद केले.
 

Web Title: malnourished girl found in malvani malad a helping hand from the child line ngo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई