मुंबई- मनपा शाळेत एकही कुपोषित विद्यार्थी नसल्याची माहिती प्रजा फाऊंडेशनने दिली आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती अधिकारातील ही माहिती प्रजाने उघड केली आहे. मनपा शाळांमधील प्रमाणाहून कमी वजन असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही घट झाल्याची माहिती प्रजाने प्रकाशित केली आहे. अंगणवाडीतील परिस्थिती मात्र भीषण असल्याचे प्रजाने उघड केले आहे.आयसीडीएस योजनेंतर्गत चालवण्यात येणाऱ्या अंगणवाडीमध्ये यावर्षी ८९ अंगणवाडी सेविका आणि ७५४ अंगणवाडी मदतनीसांची कमतरता असल्याचे प्रजाने प्रकाशित केलेल्या अहवालात समोर आले आहे. प्रमाणाहून कमी वजन असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मनपाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत कमी झाली असली, तरी अंगणवाडीत येणाऱ्या ० ते ५ वयोगटातील चिमुरड्यांपैकी १८ टक्के लहान मुलांचे वजन प्रमाणाहून कमी असल्याचेही प्रजाने मांडले आहे. राज्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशन, अर्थ संकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनात एकूण २६ आमदारांनी १४७ प्रश्न उपस्थित केले होते.मात्र यामधील मुंबईतील केवळ ५ आमदारांनी प्रत्येकी फक्त एकच प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशन, अर्थ संकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनात एकूण २६ आमदारांनी १४७ प्रश्न उपस्थित केले होते. मात्र यामधील मुंबईतील केवळ ५ आमदारांनी प्रत्येकी फक्त एकच प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई मनपा शाळांतून कुपोषण हद्दपार झाल्याचा प्रजाचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 3:49 PM