कुपोषित मुलांसाठीचे अन्न बेचव

By admin | Published: November 1, 2015 02:36 AM2015-11-01T02:36:19+5:302015-11-01T02:36:19+5:30

कुपोषणाचा प्रश्न सुटावा यासाठी कुपोषित मुलांसाठी सरकारने सुरू केलेल्या ‘टेक होम रेशन’ या योजनेअंतर्गत दिले जाणारे पदार्थ बेचव असतात. त्याला चव नसल्यामुळे सर्वेक्षणातील

Malnutrition for malnourished children | कुपोषित मुलांसाठीचे अन्न बेचव

कुपोषित मुलांसाठीचे अन्न बेचव

Next

मुंबई : कुपोषणाचा प्रश्न सुटावा यासाठी कुपोषित मुलांसाठी सरकारने सुरू केलेल्या ‘टेक होम रेशन’ या योजनेअंतर्गत दिले जाणारे पदार्थ बेचव असतात. त्याला चव नसल्यामुळे सर्वेक्षणातील सर्वच मुलांनी पदार्थांना नापसंती दर्शवल्याचे स्पष्ट झाले आहे. कुपोषित मुलांच्या संदर्भात पोषण हक्क गटाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली.
पोषण हक्क गटाने ५५ कुपोषित मुलांवर हे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात एक ते तीन वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला होता. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, बीड, अमरावती, सोलापूर आणि नागपूर येथील मुलांचा या सर्वेक्षणात समावेश होता. या सर्वेक्षणात ३४ मुले आणि २१ मुलींचा सहभाग होता. कुपोषणाचा प्रश्न हा फक्त ग्रामीण, आदिवासी भागाचा प्रश्न उरलेला नाही, तर शहरी भागातही कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. पण त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे कुपोषणाची समस्या अजूनही असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
कुपोषित मुलांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात प्रामुख्याने असे आढळून आले की, कुपोषित मुलांचे वजन वाढावे, म्हणून दिल्या जाणाऱ्या अन्नाला चव नसते. त्यामुळे ही मुले ते अन्न खाण्यास नकार देतात. यामुळे हा आहार जनावरांना दिला जातो. मुलांसाठी दिले जाणारे अन्न त्यांच्या पोटात जातच नाही. कुपोषित बालकांसाठी राज्य सरकार सध्या निधी देत आहे. मात्र, या निधीचा विनियोग आणि अंंमलबजावणी कशी होते, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच वर्षाहून अधिक काळ या योजनेचा लाभ घेणारी बालके अजूनही कुपोषण गटातच आहेत.
कुपोषित मुलांना आरोग्य सुविधेचा लाभ घेता येत नाही असेही या सर्वेक्षणातून समोर आले. ५५ मुलांपैकी २९ मुलांची गेल्या ६ महिन्यांत एकदाही आरोग्य तपासणी झाली नव्हती. पोषण आहार म्हणून भाताची पेज, बिस्कीट, चिवडा असे पदार्थ दिले जात असल्याचे उघड झाले आहे. हे पदार्थ आरोग्यास पोषक नसतानाही बालकांना देण्यात येतात. (प्रतिनिधी)

वर्षाहून अधिक काळ तीव्र कुपोषित
सर्वेक्षणात सहभागी ३१ मुलांची प्रत्यक्ष उंची आणि वजन मोजण्यात आले तेव्हा त्यातील १८ मुले एक वर्षाहून
अधिक काळ तीव्र कुपोषित गटात असल्याचे स्पष्ट झाले.

कुपोषणासाठी
काय केले पाहिजे?
मातांना विस्तृत समुपदेशन
अतिरिक्त अंगणवाडी सेविकांची नेमणूक
मुलांना पाकिटे न देता कोरडा आणि पौष्टिक आहार
वजन न वाढणाऱ्या मुलांसाठी
अतिरिक्त आहार
सरकारी आरोग्य सेवेचा तत्पर वापर
स्थलांतरित मुलांनाही अंगणवाडीचा लाभ

सर्वेक्षणात समोर आलेले सत्य
५५ मुलांपैकी..
२८ मुलांना आजारपणावेळी सरकारी संदर्भसेवा
२९ मुलांची आरोग्य तपासणी गेल्या तीन ते
सहा महिन्यांत झालेली नाही


राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत कथित तपासण्यांची नोंद नाही
अंगणवाडी सेविकेकडून पोषण आहाराच्या मार्गदर्शनासाठी घराला भेट दिल्याची नोंद बहुतांश वेळा केलेली नाही
स्थलांतरित मुलांना अंगणवाडी सेवेचा लाभ घेता येत नाही

Web Title: Malnutrition for malnourished children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.