हुसेन मेमन - जव्हार
जव्हार, मोखाडा हे तालुके 99} आदिवासी अतिदुर्गम असल्याने लाखो आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. या आदिवासी भागाचा विकास होण्यासाठी शासनाकडून करोडोच्या योजना दरवर्षी राबविल्या जातात, अधिकारी वर्गाला विविध सुविधा मिळतात, मात्र अंगणवाडीतील बालकांना कुपोषणाशी झुंज द्यावी लागत आहे. त्याचे कारण येथील बालविकास कार्यालयात अपुरा कर्मचारीवर्ग. गेल्या 3 ते 4 वर्षापासून नियमित बालविकास अधिका:याची येथे नियुक्तीच झालेली नाही.
जव्हार, मोखाडा तालुक्यात शेकडो अंगणवाडय़ा आहेत. परंतु सरासरी दरमहा 7 ते 8 बालके कुपोषणापोटी कुटीर रूग्णालयात दाखल होत आहेत. अंगणवाडी योजना ही कुपोषण थांबविण्यासाठी शासनाने सुरू केली आहे. त्याकरिता हजारो अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. पोषण आहार योजनाही सुरू आहे. तरीही कुपोषित मुले कशी आढळतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जव्हार तालुक्यात दोन बालविकास प्रकल्प आहेत. 1 जव्हार तर दुसरे साखरशेत क्र.1 येथे. एका तालुक्यात दोन कार्यालये असतानाही सरासरी 7 ते 8 मुले कुपोषणाची ही बाब गंभीर आहे.
जव्हार तालुक्यातील नांदगांव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत बंद:याचापाडा येथील प्रिया या 9 महिन्याच्या आदिवासी चिमुरडीचा कुपोषणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर ही बाब लोकमतने उचलून धरल्यानंतर जव्हार येथे मंत्र्यांचे, सचिवांचे दौरे सुरू झाले. आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, राज्यमंत्री राजेंद्र गावित, बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदि मंत्री, सचिव येऊन गेले, परंतु कोणालाही नियमित बालविकास अधिकारी उपलब्ध करून देण्यात यश आलेले नाही.
मला जव्हार बालविकास प्रकल्प अधिका:याचा अतिरिक्त पदभार मे 2क्14 पासून देण्यात आला आहे. सध्या मी बाहेर आहे. त्यामुळे कुपोषित मुलांची आकडेवारी देता येणार नाही, असे बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
जव्हार कुटीर रूग्णालयात मे मध्ये 8 मुले सॅम व मॅमची दाखल झालेली आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी सांगितले.