Join us

वडिलांचे अफेअर, पैसे देऊन थकली...; दिशा सालियानच्या मृत्यूबाबत मुंबई पोलिसांचा 'क्लोजर रिपोर्ट', नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:28 IST

दिशा सालियानने तणावातून आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

Disha Salian Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यूच्या प्रकरणावरुन राज्यात नवा वाद उफाळून आला आहे. पाच वर्षांनंतर दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात या प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला. याप्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अशातच मुंबई पोलिसांनी काढलेल्या निष्कर्षामुळे या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे.

दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून केला. मात्र दिशाच्या शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे समोर आलं. दिशाचा डोक्याला गंभीर जखमा आणि अनेक फ्रॅक्चर झाल्याने मृत्यू झाला होता. डोळे, हात, पाय यांना जखमा झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आलं होतं. ८ जून २०२० रोजी दिशाचा मृत्यू झाल्यानंतर ११ जून २०२० ला शवविच्छेदन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.

मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियानने आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आलं आहे. दिशा सालियान आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. तिच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होतं आणि त्यासाठी ती पैसे देऊन थकली होती. दिशाने वडिलांच्या अफेरबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं. याच तणावातून तिने आत्महत्या केली असा निष्कर्ष मालवणी पोलिसांनी काढला होता. 

टॅग्स :दिशा सालियान मृत्यू प्रकरणमुंबई पोलीसगुन्हेगारी