Join us

माँ, तुझे सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 12:57 AM

स्वातंत्र्य दिनी विधान भवन, उच्च न्यायालय, मुंबई महापालिका, प्रकाशगड, म्हाडा आणि मुंबई विद्यापीठासह मुंबई शहर आणि उपनगरात सर्वत्रच तिरंग्याला सलामी देण्यात आली.

मुंबई : स्वातंत्र्य दिनी विधान भवन, उच्च न्यायालय, मुंबई महापालिका, प्रकाशगड, म्हाडा आणि मुंबई विद्यापीठासह मुंबई शहर आणि उपनगरात सर्वत्रच तिरंग्याला सलामी देण्यात आली. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी आयोजित विविध कार्यक्रमांतून देशाभिमान व्यक्त करण्यात आला. शाळा, महाविद्यालयांसह सोसायट्यांमध्येही करण्यात आलेल्या ध्वजारोहणाला बच्चे कंपनीसह ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती. राष्ट्राभिमान जागृत करणाºया सुरांची स्वातंत्र्य दिनाला साथ मिळाल्याने ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांनी मुंबापुरीला स्फूर्ती चढली होती.विधान भवन येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार हुस्नबानू खलिफे, विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव यू.के. चव्हाण, सह सचिव तथा सभापतींचे सचिव महेंद्र काज, उपसचिव राजेश तारवी, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव सोमनाथ सानप, रवींद्र जगदाळे, सुनील झोरे, विजय कोमटवार उपस्थित होते.उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्य न्यायाधीशांचे पती डॉ. सी.एन. गुप्ता, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश व्ही.के. तहलरामानी, न्यायाधीश नरेश पाटील, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश गोखले, मराठी चित्रपट अभिनेते रमेश भाटकर उपस्थित होते.महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते मुंबई महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, महापालिका आयुक्त अजय मेहता, माजी नगरसेवक अवकाश जाधव, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए.एल. जºहाड तसेच उपायुक्त, खाते प्रमुख, सहायक आयुक्त, इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. महापालिका मुख्यालयाच्या आवारातील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौरांनी प्रारंभी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महापालिका चिटणीस खात्यातर्फे प्रकाशित करण्यात येणाºया वार्षिक प्रकाशन - २०१७चे महापौरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर सुरक्षा दल व अग्निशमन दलातर्फे महापौरांना मानवंदना देण्यात आली. तसेच बाबासाहेब वरळीकर यांच्या ४५व्या स्मृतिदिनानिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महावितरण व महानिर्मितीचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी ध्वजारोहण केले. या वेळी महावितरणचे वाहनचालक दीपक दिनकर कदम आदी उपस्थित होते.