Join us

'ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अवमान केला, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 2:09 PM

मुंबई दौऱ्या दरम्यान मुंबईतील वायबी सेंटर येथे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार यांच्याशी संवाद साधल्यानतंर राष्ट्रगीता कार्यक्रम पार पडला. त्यावेळी, त्यांना राष्ट्रगीताचा (National Anthem) सन्मान राखण्याचा विसर पडल्याचा आरोप होत आहे

ठळक मुद्देशेवटी राष्ट्राभिमान महत्वाचा आहे, परंतु देशाभिमानापेक्षा त्यांना राजकारण मोठे वाटले, असे म्हणत दरेकर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. (Mamata Banerjee in Mumbai) केंद्रात मोदीविरोधी मोट बांधण्यासाठी त्यांनी मुंबईत महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे, त्याचा हा दौऱ्यावरुन भाजपा नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. त्यातच, मुंबईतील वायबी सेंटरमध्ये राष्ट्रगीत गाताना त्या खाली बसल्या होत्या. त्यावरुन, भाजप नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ममता बॅनर्जींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

मुंबई दौऱ्या दरम्यान मुंबईतील वायबी सेंटर येथे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार यांच्याशी संवाद साधल्यानतंर राष्ट्रगीता कार्यक्रम पार पडला. त्यावेळी, त्यांना राष्ट्रगीताचा (National Anthem) सन्मान राखण्याचा विसर पडल्याचा आरोप होत आहे. ममता यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये, बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली. पण, त्या राष्ट्रगीत अर्धवटच बोलल्या. इतकेच नाही तर ते माध्यमांसमोर राष्ट्रगीत खाली बसून गायल्या. त्यामुळे ममता दीदींकडून राष्ट्रगीतचा अवमान झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर, प्रवीण दरेकर यांनी ममता बॅनर्जींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

"ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. एकतर त्या राष्ट्रगीत बसून म्हणाल्या, इतकंच नाही तर राष्ट्रगीत अर्धवट म्हणत उठल्या. या अवमानासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेवटी राष्ट्राभिमान महत्वाचा आहे, परंतु देशाभिमानापेक्षा त्यांना राजकारण मोठे वाटले, असे म्हणत दरेकर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

राष्ट्रगीताबद्दल कायदा काय सांगतो?

"आपल्या राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्य नमूद केले आहेत. त्या मुलभूत कर्तव्यांमध्ये अनुच्छेद 51 (A) प्रमाणे राष्ट्रगीत, राष्ट्रीय झेंडा आणि राष्ट्रीय मानचिन्हांचा योग्य पद्धतीने आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे केंद्रीय पातळीवर असणारा Prevention of Insult National Honour Act या नावाचा 1971 सालाचा कायदा आहे. त्या कायद्यात कलम 3 असं म्हणतं की, एखाद्या ठिकाणी राष्ट्रगीत चालू असताना ते राष्ट्रगीत म्हणायला प्रतिबंध करणं किंवा जी लोकं राष्ट्रगीत म्हणत आहेत त्यांना अडथळा निर्माण केला तर तो गुन्हा धरला जातो. तसं केल्यास तीन वर्षापर्यंतची शिक्षा ठोठावली जाऊ शकते" 

टॅग्स :मुंबईममता बॅनर्जीप्रवीण दरेकरराष्ट्रगीत