'मामी'मध्ये ७० हून अधिक महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांची धूम; मराठी टॉकीजमध्ये 'आत्मपॅम्प्लेट'

By संजय घावरे | Published: October 9, 2023 05:22 PM2023-10-09T17:22:47+5:302023-10-09T17:23:02+5:30

'वेड', 'ढेकूण', 'वाळवी'; १० दिवसांमध्ये २५० हून अधिक सिनेमे

'Mami' features more than 70 women directors' films; 'Aatpamphlet' in Marathi Talkies | 'मामी'मध्ये ७० हून अधिक महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांची धूम; मराठी टॉकीजमध्ये 'आत्मपॅम्प्लेट'

'मामी'मध्ये ७० हून अधिक महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांची धूम; मराठी टॉकीजमध्ये 'आत्मपॅम्प्लेट'

googlenewsNext

मुंबई: जगभरातील सिनेप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मुंबई फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच 'मामी'ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात आयोजित करण्यात आलेल्या 'मामी'मध्ये ७० हून अधिक महिला दिग्दर्शकांचे सिनेमे दाखवले जाणार हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 'मामी'च्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर, दिग्दर्शिका झोया अख्तर, फरहान अख्तर, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने, रोहन सिप्पी, अभिनेता राणा दगुबत्ती, अजय बिजली या सदस्यांसोबत महोत्सव संचालिका अनुपमा चोप्रा, सहसंचालिका मैत्रेयी दासगुप्ता, फेस्टिव्हलच्या इंटरनॅशनल प्रोगॅमिंग विभाग प्रमुख अनु रंगचर आदी मंडळी उपस्थित होती. दिग्दर्शक कबीर खान उशीरा पोहोचले. देशातील ७० हून अधिक भाषांमधील २५० हून अधिक सिनेमे, २० स्क्रिन्स, ८ कार्यक्रम स्थळे, अत्याधुनिक कला महोत्सव केंद्र  आणि महिला दिग्दर्शकांच्या ७० हून अधिक चित्रपटांचा समावेश असणार आहे.

पेड्रो अल्मोडोवर, ब्रॅडले कुपर, अनुराग कश्यप, अकी कौरीस्माकी, अॅलिस रोहरवॉचर, अँजेला शॅनलेक, केन लोच, वँग बिंग, विम वेंडर्स अशा दिग्गज्जांसोबत दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नवोदितांचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. या वैविध्यपूर्ण महोत्सवात ४० हून अधिक वर्ल्ड प्रीमिअर्स पार पडणार असून, ४५ आशिया प्रीमिअर्स आणि ७० हून अधिक दक्षिण आशिया प्रीमिअर्स होणार आहेत. यंदा दक्षिण आशिया विभागासाठी विक्रमी १००० हून अधिक सिनेमांच्या प्रवेशिका आल्या आहेत. यंदा दक्षिण आशिया स्पर्धा सर्वात महत्त्वाची असेल. दक्षिण आशिया आणि दक्षिण आशियातून जगभरात पोहोचलेल्या सिनेकर्त्यांसाठी, त्यांच्यातील प्रतिभेसाठी महत्त्वाचे केंद्र बनण्याचे या महोत्सवाचे नवे उद्दिष्ट या स्पर्धेतून दिसून येते. नव्या दमाचे, वेगळे समकालीन दक्षिण आशियाई सिनेमे प्रेक्षकांसमोर आणणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. 

मराठी टॉकीज...

२०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'मराठी टॉकीज' या विभागात समकालीन मराठी सिनेमातील उत्कृष्ट कलाकृतींचा समावेश करण्यात येतो. यंदा या विभागामध्ये दिग्दर्शक आशिष बेंडे यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'आत्मपॅम्फ्लेट', मागच्या वर्षाची अखेर गाजवणारा रितेश देशमुखचा 'वेड', क्षितिज जोशी' दिग्दर्शित 'ढेकूण' आणि परेश मोकाशींचा 'वाळवी' हे सिनेमा दाखवले जातील. सचिन चाटे यांनी या विभागातील सिनेमांची निवड केली आहे.

स्पर्धा आणि बरेच काही...

साऊथ एशिया स्पर्धा विभागात विविध भाषांमधील १४ समकालीन आणि महत्त्वपूर्ण असे १४ सिनेमे असतील. यात सुमंत भट यांचा 'मिथ्या', लीझा गाझी यांचा 'बरिर नाम शहाना', फिडेल देवकोटा यांचा 'द रेड सुटकेस' या सिनेमांचा समावेश आहे. गाला प्रीमिअर साऊथ एशियामध्ये अनुराग कश्यप यांचा 'केनेडी', ताहिरा कश्यप यांचा 'शर्माजी की बेटी', रजत कपूर यांचा 'एव्हरीबडी लव्हस सोहराब हांडा', तर डायमेन्शन्स मुंबईमध्ये विदार जोशी यांचा 'शुड आय किल मायसेल्फ ऑर हॅव अ कप ऑफ कॉफी?' कुमार छेडा यांचा 'हाफवे', अंजनी चढ्ढा, निवेदिता राणी यांचा 'सिटी ऑफ मिराज' दाखवले जातील. शॉर्ट फिल्म्स विभागामध्ये दिबांकर बॅनर्जी यांचा 'बॅडमिंटन', रिशव कपूर यांचा 'नेक्स्ट प्लीज', श्रीरंग पाठक यांचा 'थेंब' दाखवला जाईल.

Web Title: 'Mami' features more than 70 women directors' films; 'Aatpamphlet' in Marathi Talkies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.