उमरखेड तालुक्यातून गावरानी आंबा झाला हद्दपार

By admin | Published: May 27, 2016 02:16 AM2016-05-27T02:16:33+5:302016-05-27T02:16:33+5:30

नामांकित गावरानी आंब्यासाठी उमरखेड तालुका प्रसिद्ध होता गावागावात आमराई होती.

Mammoots grown from Umarkhed taluka | उमरखेड तालुक्यातून गावरानी आंबा झाला हद्दपार

उमरखेड तालुक्यातून गावरानी आंबा झाला हद्दपार

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठातील परीक्षा भवनामधील सुरक्षा यंत्रणांत असलेल्या त्रुटींमुळेच अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका घोटाळा झाल्याची कबुली कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली आहे. गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशमुख म्हणाले की, १ लाख ८३ हजार चौरस फूट व्याप्ती असलेल्या परीक्षा भवनाच्या दोन इमारतींमधील केवळ एकाच इमारतीत २० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दरम्यान, परीक्षा भवनात इतर प्रशासकीय कार्यालयांमुळे या ठिकाणी महत्त्वाच्या व्यक्तींशिवाय अनभिज्ञ व्यक्तींचीही ये-जा असते. परिणामी ओळखपत्र आणि अंगझडतीशिवाय संबंधित व्यक्तींवर केवळ सीसीटीव्हींद्वारे लक्ष ठेवणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले. परिणामी यापुढे सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी दूर करून, अशा प्रकरणांना चाप लावण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, यापुढे ओळखपत्र तपासल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला परीक्षा भवनात प्रवेश मिळणार नाही. शिवाय मोजक्याच लोकांना या ठिकाणी ये-जा करण्यास परवानगी असेल. तरी या ठिकाणची सुरक्षा चोख करण्यासाठी आणखी काय करता येईल, याबाबत तज्ज्ञांकडून आढावा घेण्यात येत असून त्याचा अहवाल येत्या १५ दिवसांत येईल.

‘ते’ विद्यार्थी
नवी मुंबई केंद्रातील
उत्तरपत्रिका घोटाळ्यात ८४ मुलांची नावे समोर येत आहेत. हे विद्यार्थी कोणत्या विभागातील किंवा महाविद्यालयातील आहेत, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सर्व विद्यार्थी नवी मुंबईतील २० महाविद्यालयांतील केंद्रातील असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली आहे.

पाळेमुळे शोधणार
उत्तरपत्रिका घोटाळ्याची पाळेमुळे शोधून काढणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. सत्यशोधन समितीचा अहवाल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना सादर केला आहे. त्यात निवृत्त न्यायाधीशांमार्फतचौकशी करण्याची मागणीही केली आहे. सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Mammoots grown from Umarkhed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.