बॉलीवूड कलाकारांना चरसचा पुरवठा करणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:08 AM2021-09-04T04:08:42+5:302021-09-04T04:08:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलीवूडमधील कलाकारांना चरसचा पुरवठा करणाऱ्या एका यू ट्यूब चॅनेलच्या संचालकाला अमली पदार्थविरोधी विभागाच्या वांद्रे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूडमधील कलाकारांना चरसचा पुरवठा करणाऱ्या एका यू ट्यूब चॅनेलच्या संचालकाला अमली पदार्थविरोधी विभागाच्या वांद्रे पथकाने शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत. गौतम दिलीप दत्ता (४६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ५० लाख किमतीचे एक किलो चरस जप्त करण्यात आले आहे.
जुहू वर्सोवा लिंक रोड परिसरात दत्ताच्या संशयास्पद हालचाली एएनसीच्या वांद्रे पथकाने हेरल्या. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडील लाल पिशवीची तपासणी करताच, त्यात एक किलो चरस सापडले. दत्ता हा बीग गी यू ट्यूब चॅनेलचा संचालक आहे. यातूनच झालेल्या ओळखीतून तो बॉलीवूडमधील कलाकारांना चरसचा पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार त्याच्याविरुद्ध चरस विक्रीप्रकरणी गुन्हा नोंदवत एएनसी अधिक तपास करत आहे.