एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:05 AM2021-04-02T04:05:53+5:302021-04-02T04:05:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सांताक्रुझ परिसरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी एकाला अटक केली ...

Man arrested for trying to blow up ATM | एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सांताक्रुझ परिसरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मोहम्मद अरमान शेख असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो एका एटीएममध्ये लपून हातोडी व अन्य अवजारांच्या साहाय्याने ते फोडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच वेळी सुरक्षारक्षक कृष्णा पवार यांनी त्याला पाहिले आणि वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेखने पवार यांना चाकू आणि कैचीचा धाक दाखविण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान साकीनाका पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन घटनास्थळाहून निघाली होती. हा प्रकार समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शेखला त्यांनी पकडले आणि संबंधित कलमांनुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Man arrested for trying to blow up ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.