Join us

"मुबारक हो, मुंबई मे हमला होनेवाला है"; वाहतूक पोलिसांच्या WhatsApp वर धमकीचा मेसेज

By गौरी टेंबकर | Published: August 20, 2022 11:09 AM

पोलिस ट्रॅफिक कंट्रोलला शनिवारी २६/११ प्रमाणे  हल्ल्याची धमकी रात्री ११ च्या सुमारास मिळाली असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई - जी मुबारक हो, मुंबई मे ह मला होने वाला है २६/११ की नई ताजी याद दिलाएगा असा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी रात्री आला आहे. त्यामुळे सर्व पोलीस ठाणे व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.

पोलिस ट्रॅफिक कंट्रोलला शनिवारी २६/११ प्रमाणे  हल्ल्याची धमकी रात्री ११ च्या सुमारास मिळाली असे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाच्या WhatsApp वर पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा संदेश पाठवण्यात आला होता. त्याचे 'लोकेशन ट्रेस' केल्यास ते भारताबाहेर असल्याचे आढळून येईल, असे मेसेंजरने सांगितले होते. मुंबईत हल्ला होईल, अशी धमकी संदेशवाहकाने दिली.

धमकीच्या संदेशात असेही म्हटले आहे की ६ लोक ही योजना भारतात राबवतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके घेऊन जाणारी एक बोट जप्त केल्यानंतर दोन दिवसांनी ही धमकी आली आहे. २००८ मध्ये मुंबईवरील हल्ला ही दहशतवादी मालिका होती. 

२६ नोव्हेंबर २००८ रोजी सुरू झालेले हल्ले ज्यात लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानी इस्लामी दहशतवादी संघटनेच्या १० सदस्यांनी चार दिवसांच्या कालावधीत मुंबईत १२ ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट हल्ले केले होते. हा तपास वाहतूक पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे असे एका अधिकाऱ्याने लोकमत ला सांगितले. त्यानुसार याबाबत तपास सुरू आहे.

धमकी नही,हकीकत मे आयेंगे!

जी मुबारक हो मुंबई मे हमला होने वाला है,2611 की नई ताजी याद दिलाएगा असे म्हणत काही काँटॅक्ट क्रमांक शेअर करण्यात आले आहेत. पुढे मुंबई को उडाने की तैयारी कर रहे है, युपी एटीएस करवाना चाहती है मुंबई उडाना, मै पाकिस्तान से,आपके कुछ इंडियन्स मेरे साथ है, जो मुंबई कोडवाना चाहीये, और ये धमकी नही आयेंगे हकीकत मे हो,मेरा लोकेशन यहा का ऍड्रेस करेगा लेकिन काम मुंबई मे चलेगा ,हम लोगो का कोई ठिकाना नही होता,लोकेशन आपको आऊट ऑफ कंट्री ट्रेस होगा, हमला २६११ मुंबई मे होगा,मैने पेहले इसलिये आप से इंडिया का के नंबर आपको दे दिजिए, उदय पुर जैसा भी कांड हो सकता है तन से जुदा जूदा सर,ok याद होगा पंजाब का सिधू मुझसेवाला एस तरह की भी हरकत हो, कुछ भी हो अमेरिका का भी हम ना याद होगा तारीख आपको दू, अगर एक हो सामा ,एक अजमल कसाब एक आई वॉन्ट ऑल जवारी मर गया तो, काफी ऑल जवारी ल भारी है,ok.. असे या मेसेंजरने वाहतूक पोलिसांना लिहिले आहे.

 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस26/11 दहशतवादी हल्ला