मोर्चात एकाला आली भोवळ, आदित्य ठाकरेंनी थांबवलं भाषण अन्...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 06:08 PM2023-07-01T18:08:54+5:302023-07-01T18:11:03+5:30

मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मुंबई मनपाच्या मुख्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.

man get dizziness in morcha Aditya Thackeray stopped his speech and ask for water | मोर्चात एकाला आली भोवळ, आदित्य ठाकरेंनी थांबवलं भाषण अन्...!

मोर्चात एकाला आली भोवळ, आदित्य ठाकरेंनी थांबवलं भाषण अन्...!

googlenewsNext

मुंबई-

मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मुंबई मनपाच्या मुख्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात हजारोंच्या संख्येनं ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबई मनपाच्या मुख्यालयाजवळ व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. आदित्य ठाकरे यांनी मोर्चाचं नेतृत्त्व केल्यानंतर याच व्यासपीठावरुन उपस्थितांना संबोधित केलं. आदित्य ठाकरे यांचं भाषण सुरू असतानाच समोर जमलेल्या गर्दीत एका व्यक्तीला भोवळ आली. आदित्य ठाकरे यांनी तातडीनं याची दखल घेत आपलं भाषण थांबवलं आणि संबंधित व्यक्तीकडे लक्ष देण्याची सूचना केली. 

"...त्यादिवशी फाईल घेऊन पोलिसांसह आम्ही आत घुसणार!"; आदित्य ठाकरे यांचा थेट इशारा

आदित्य ठाकरे यांनी भोवळ आलेल्या व्यक्तीला पाणी देण्यास सांगितलं. तसंच आपलं भाषण थोडावेळ थांबवण्याचीही तयारी दाखवली. "त्यांना पाणी द्या. बाजूला मोकळ्या जागेत घेऊन जा...त्यांना बरं वाटू द्या. मग मी बोलतो", अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी केली. भोवळ आलेल्या व्यक्तीला बरं वाटत असल्याचं उपस्थितांनी सांगितलं. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. 

...तेव्हा आम्ही फाइल आणि पोलीस घेऊन घुसू
मुंबई मनपातील भ्रष्टाचारांचे आरोप करत आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. तसंच मुंबई मनपातील घोटाळ्यांचे सगळे पुरावे आणि फाइल आपल्याकडे असून ज्या दिवशी मविआचं सरकार येईल त्यादिवशी पोलीस घेऊन आम्ही तुमच्या घरात घुसू. तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ, सरकारच्या घोटाळ्याची फाइल तयार आहे, असा रोखठोक इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: man get dizziness in morcha Aditya Thackeray stopped his speech and ask for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.