तब्बल 30 वर्षांनंतर सापडली आईची सोन्याची चेन अन् मुलांनी घेतला 'सोन्या'सारखा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 12:26 PM2020-01-15T12:26:15+5:302020-01-15T12:44:18+5:30
चेन, मोबाईल यासारख्या मौल्यवान वस्तू लंपास करून चोर पसार होतात.
मुंबई - चोरीच्या घटना या सातत्याने समोर येत असतात. रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांचा हमखास खिसा कापला जातो. तसेच चेन, मोबाईल यासारख्या मौल्यवान वस्तू लंपास करून चोर पसार होतात. पोलीस ठाण्यातही चोरीच्या असंख्य तक्रारी या दररोज दाखल केल्या जातात. मात्र अनेकदा चोरीला गेलेली वस्तू सापडेलच याची खात्री नसते. त्यातही वस्तू सोन्याची असेल तर मग काहीच खरं नसतं. तब्बल 33 वर्षांनी चोरीला गेलेली सोन्याची चेन सापडली असं कोणी सांगितलं. तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे.
मुंबईतील एका व्यक्तीला तब्बल 33 वर्षानंतर आईची चोरीला गेलेली सोन्याची चेन परत मिळाली आहे. 1986 मध्ये मंदिरात जात असताना चोरांनी सोन्याची चेन चोरली होती. दिलीप शहा यांच्या आईची चेन चोरांनी लंपास केली होती. गेल्या आठवड्यात दिलीप शहा यांना रेल्वे पोलीस आयुक्त कार्यालयातून पत्र आले असून त्यामध्ये चेनची माहिती देण्यात आली आहे. शहा यांच्या सोबत 104 जणांना त्यांचे चोरीला गेलेले दागिने, पैसे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळाल्या आहेत.
दिलीप शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आईची सोन्याची चेन चोरीला गेली तेव्हा माझं वय हे 27-28 वर्ष होतं. आई दररोज मंदिरात जात असे. तिच्या गळ्यात एक चेन असायची मात्र एक दिवस ती चोरीला गेली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता तब्बल 33 वर्षांनी चोरीला गेलेली चेन मिळाली आहे. मात्र आता आईचे निधन झाले आहे. त्यामुळे ही सोन्याची चेन मंदिरात दान करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.'
काही वर्षांपूर्वी पोलिसांनी चोरीची ही केस पुन्हा सुरू केली. दोन वर्षांपूर्वी शहा यांच्या जुन्या पत्त्यावर पोलिसांनी पत्र पाठवले आणि तपासाबाबत माहिती दिली. दिलीप शहा यांच्या आईचे आता निधन झाल्याने ते चेन एका मंदिराला ते दान करणार आहेत. चोरीला गेलेली चेन परत मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
आयसीसीच्या कसोटी व वन डे संघाचे नेतृत्व कोहलीकडे, जाणून घ्या भारताच्या कोणत्या खेळाडूंना संधी
Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये '2-जी' इंटरनेट सेवा
CAA: मोदींच्या गुजरातमध्ये विरोधाचे पतंग गुल; उडवण्यापूर्वीच पोलिसांकडून जप्त
अर्जुनाच्या बाणांमध्ये होती अणुशक्ती! बंगालच्या राज्यपालांचा दावा
सीएएवर मलेशियाच्या पंतप्रधानांची आगपाखड, भारत असा शिकवणार धडा