PF Balance चेक करणे पडले महागात! 1.23 लाखांची फसवणूक, फोन नंबर ठरले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 12:56 PM2022-11-20T12:56:48+5:302022-11-20T12:58:32+5:30

PF Fraud : अलीकडेच एका व्यक्तीला पीएफ बॅलन्स तपासणे महागात पडले आहे. जेव्हा त्याच्यासोबत असे काही घडले, ज्याची त्याला माहिती देखील नव्हती.

man got scammed while checking pf balance | PF Balance चेक करणे पडले महागात! 1.23 लाखांची फसवणूक, फोन नंबर ठरले कारण...

PF Balance चेक करणे पडले महागात! 1.23 लाखांची फसवणूक, फोन नंबर ठरले कारण...

googlenewsNext

मुंबई : सर्व नोकरदार लोक वेळोवेळी आपला पीएफ बॅलन्स तपासत राहतात. मात्र, जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर ईपीएफओ कस्टमर केअरची मदत देखील घेतली जाऊ शकते आणि बॅलन्स तपासला जाऊ शकतो. सर्वात सोपा मार्ग म्हणजे ईपीएफओच्या वेबसाइटवर जाणे किंवा उमंग अॅप डाउनलोड करणे. याठिकाणी  तुम्हाला पीएफ बॅलन्स किती आहे, याबाबत माहिती मिळेल. दरम्यान, अलीकडेच एका व्यक्तीला पीएफ बॅलन्स तपासणे महागात पडले आहे. जेव्हा त्याच्यासोबत असे काही घडले, ज्याची त्याला माहिती देखील नव्हती.

मुंबईतील एका 47 वर्षीय व्यक्तीने आपल्या पीएफ अकाउंटमधील बॅलन्स तपासण्यासाठी ईपीएफओ कस्टमर केअरची मदत घेण्याचा निर्णय घेतला, परंतु समस्या अशी होती की, त्या व्यक्तीकडे कस्टमर केअरचा नंबर नव्हता. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने गुगलवर नंबर शोधण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याला मिळालेला ईपीएफओ कस्टमर केअर नंबर बनावट होता आणि तो नंबर स्कॅमर्सच्या माध्यमातून अपलोड करण्यात आला होता.

अंधेरीच्या एका 47 वर्षीय व्यक्तीला स्कॅमर्सनी रिमोट अॅक्सेस अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. फक्त येथेच व्यक्तीने चूक केली. त्यानंतर एकूण 14 वेगवेगळे व्यवहार करून त्याच्या अकाउंटमधून 1.23 लाख रुपये काढण्यात आले. ती व्यक्ती एका खाजगी कंपनीत कर्मचारी आहे. तुम्हालाही तुमच्या पीएफ अकाउंटचा बॅलन्स तपासायचा असेल, तर तुम्ही सावधगिरीने काम करावे आणि अधिकृत वेबसाइट किंवा उमंग अॅपची मदत घ्यावी. कस्टमर केअर नंबरचा वापर तेव्हाच केला पाहिजे जेव्हा तुम्हाला त्याबद्दलची योग्य माहिती असेल, अन्यथा तुम्हीही अशा फसवणुकीला बळी पडू शकता.

Web Title: man got scammed while checking pf balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.