पत्नीचा आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर केला अपलोड; नातेवाईक अन् मित्रांचे फोन, घडलं वेगळच!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 09:29 AM2021-09-10T09:29:45+5:302021-09-10T09:33:59+5:30
पत्नीचा आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी मुंबईत एकाला अटक करण्यात आली आहे.
मुंबई: आपल्या दुसऱ्या पत्नीचा आक्षेपार्ह फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करणे कुरिअर कंपनीच्या मालकाला चांगलेच महागात पडले आहे. पत्नीचा आक्षेपार्ह फोटो समाजमाध्यमांवर शेअर केल्याप्रकरणी बोरीवलीतील कुरिअर कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपीची २०२० मध्ये त्याच्या कार्यालयात पीडितेशी भेट झाली. तिने नोकरीसाठी त्याच्याकडे अर्ज केला होता. त्यानंतर दोघे प्रेमात पडले आणि २७ जुलै २०२१ रोजी त्यांनी अमृतसरमध्ये लग्न केले. त्यानंतर हे जोडपे ३० जुलै २०२१ रोजी डोंबिवलीतील एका घरात राहायला गेले. काही दिवसांनंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली, ज्याला कंटाळून ती बोरिवलील तिच्या पालकांच्या घरी परतली. नंतर तिला समजले की, आरोपी आधीच विवाहित आहे आणि त्याने त्याचा संपर्क क्रमांक ब्लॉक केला आहे.
गावातील मुलीच्या प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय शाळकरी मुलाचा खून; कोल्हापूरात खळबळ https://t.co/ODOxL4gW5p
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2021
६ सप्टेंबर रोजी जेव्हा तिला तिच्या नातेवाईक आणि मित्रांकडून इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोबद्दल फोन येऊ लागले, तेव्हा तिने असे कोणतेही खाते तयार केल्याचे नाकारत एमएचबी पोलिसांत तक्रार केली. याबाबत आरोपीने तिच्या आईला फोन केला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्रास दिला तर असे आणखी फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी दिली. त्यानुसार एमएचबी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय धोत्रे यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने आरोपीला बोरिवली पश्चिम येथून अटक केली. त्याच्यावर विनयभंग तसेच आयटी कायद्याचे कलम ६७ दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
दुबईत नोकरी लागली, कौतुकही झालं; आई- भावासोबत जेवली अन् मग वेगळाच निर्णय घेतला! https://t.co/oeQ2XcdyJ3
— Lokmat (@MiLOKMAT) September 7, 2021