भर दुपारी घरात शिरलेल्या अनोळखीने मारली मिठी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 06:24 AM2019-11-04T06:24:09+5:302019-11-04T06:24:49+5:30

मुंबई : आईकडून पैसे घ्यायचे असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने घरात प्रवेश केला. तरुणी आईला फोन करण्यासाठी मागे वळताच, तिला ...

man hug to girl afternoon in kandivali, complaint in police | भर दुपारी घरात शिरलेल्या अनोळखीने मारली मिठी

भर दुपारी घरात शिरलेल्या अनोळखीने मारली मिठी

googlenewsNext

मुंबई : आईकडून पैसे घ्यायचे असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने घरात प्रवेश केला. तरुणी आईला फोन करण्यासाठी मागे वळताच, तिला मिठी मारून तरुण पसार झाल्याची घटना कांदिवलीत घडली. तरुणीच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांदिवली परिसरात तक्रारदार २० वर्षीय तरुणी कुटुंबीयांसोबत राहते. ३० आॅक्टोबरला दुपारी पावणेतीनच्या सुमारास ती घरात एकटी असताना, एक अनोळखी तरुण दारात धडकला. तरुणीने त्याच्याकडे विचारणा करताच, आईकडून पैसे घ्यायचे असल्याचे त्याने सांगितले. तरुणी आईला फोन करण्यासाठी मागे वळताच तरुणाने आतमध्ये प्रवेश करत तरुणीला मिठी मारली. तिच्यासोबत अश्लील चाळे करत पळ काढला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने किंकाळी फोडताच शेजारचे गोळा झाले. तिने घडलेला प्रकार सांगण्यापूर्वीच आरोपी पसार झाला होता. सायंकाळी घरी परतलेल्या आईला तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने मुलीसह कांदिवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, कांदिवली पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा २५ ते ३० वयोगटांतील आहे. तरुणीने केलेल्या वर्णनावरून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातही खळबळ उडाली आहे. तरुणींनीही याची धसका घेतला आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने हा प्रकार केला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. स्थानिक खबरी, सीसीटीव्हींद्वारे पोलीस तपास करत आहेत.

Web Title: man hug to girl afternoon in kandivali, complaint in police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.