Join us

ATM मध्ये मुलीसमोर अश्लिल चाळे करणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 10:45 AM

मुंबई उपनगरातील मुलुंड येथे एटीएममध्ये पैसे काढण्याच्या बहाण्यावरुन मुलीसमोर अश्लिल चाळे केल्याची घटना समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली.

मुंबई - मुंबई उपनगरातील मुलुंड येथे एटीएममध्ये पैसे काढण्याच्या बहाण्यावरुन मुलीसमोर अश्लिल चाळे केल्याची घटना समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली असून मुलीने हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केल्याने ही घटना उघडकीस आली. 

एक 23 वर्षीय युवती रात्री तीनच्या दरम्यान एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली. पैसे काढताना मुलीला एटीएममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यावेळी एटीएमच्या बाहेर उभ्या असणाऱ्या माणसाने मदत करण्याच्या बहाण्याने एटीएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या मुलीसोबत अश्लिल चाळे करु लागला. युवतीने ही सगळी घटना आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये रेकॉर्ड केली. त्यानंतर आरोपी फरार झाला. मात्र युवतीने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केल्यानंतर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण घटनेची माहिती त्या तरुणीने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन दिली आहे. 

या तरुणीने सांगितले की, शनिवारी रात्री मी ब्रांद्रा येथून माझ्या घरी जाण्यासाठी निघाली. घराजवळ पोहचल्यानंतर रिक्षावाल्याला भाड्याचे पैसे देण्यासाठी मी जवळच्या एटीएममध्ये गेली. जेव्हा मी एटीएममध्ये गेली तेव्हा काही कारणास्तव पैसे न आल्याने मला राग येत होता. त्यावेळी एटीएमच्या बाहेर असणारा माणूस एटीएममध्ये मदत करण्यासाठी आत आला. त्याने मी तुमच्या रिक्षाचे भाडे देतो असं सांगितल्यानंतर मी आदरपूर्वक त्या माणसाला नकार देत काहीतरी मॅनेज करते असं सांगितले. मी एटीएमच्या बाहेर निघाल्यानंतर रिक्षावाल्याशी भाड्यावरुन वाद झाला. त्यानंतर त्याठिकाणी पोलीस देखील आली. पोलिसांशी बोलल्यानंतर मी पुन्हा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली. त्यावेळी परत एटीएममध्ये तो माणूस आला. मी त्या माणसाला दूर व्हा असं सांगितलं तर त्याने अश्लिल चाळे करु लागला. त्यानंतर मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायला सुरुवात केली. मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या माणसाने एटीएममधून पळ काढला. मात्र त्यावेळी बाहेर उभ्या असणाऱ्या पोलिसांच्या गाडीकडे मी धावत गेली त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला आरोपीला अटक केली.   

टॅग्स :गुन्हेगारीएटीएमपोलिस