कुर्ला स्थानकात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न, आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 11:56 AM2018-07-31T11:56:16+5:302018-07-31T11:57:13+5:30
कुर्ला स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे.
मुंबई - कुर्ला स्थानकात एका 54 वर्षीय व्यक्तीने रेल्वे रुळावर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र स्थानकात उपस्थित असलेले आरपीएफ जवान आणि प्रवाशांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आले. आत्महत्या करण्यासाठी ही व्यक्ती रुळावर येऊन झोपली. मात्र हे पाहून प्लॅटफॉर्मवरील इतर प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. ड्युटीवर तैनात असणाऱ्या आरपीएफच्या जवानांनी तत्परता दाखवत त्यांचा जीव वाचवला. हा सर्व प्रकार कुर्ला स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
#WATCH: A man was saved by Railway Protection Force (RPF) personnel & other passengers after he attempted to commit suicide at #Mumbai's Kurla railway station. (30.07.2018) (Source: CCTV) pic.twitter.com/6Yz5WB2Tsw
— ANI (@ANI) July 30, 2018
नरेंद्र कोटेकर (54) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून ते चेंबूरचे रहिवासी आहेत. कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं. कोटेकर रुळावर झोपले असताना आरपीएफच्या जवानांनी तातडीने त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांचा जीव वाचवला. आरपीएफ अधिकाऱ्यांनी कोटेकर यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. तसेच कोटेकर यांना आत्महत्या न करण्याचा सल्लाही दिला. तत्परतेने कोटेकर यांचा जीव वाचवणाऱ्या आरपीएफ जवानांचं सर्वत्र कौतुक होत आहे.