शिवछत्रपतींना मानाचा मुजरा

By admin | Published: February 19, 2015 10:56 PM2015-02-19T22:56:57+5:302015-02-19T22:56:57+5:30

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि मराठी मनाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३६८ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Mancha mujra to Shiv Chhatrapati | शिवछत्रपतींना मानाचा मुजरा

शिवछत्रपतींना मानाचा मुजरा

Next

पेण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि मराठी मनाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३६८ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ३५० वर्षांपूर्वी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य, गडकोट किल्ले, अष्टप्रधान मंडळ ही शौर्य व पराक्रमाची देणगी स्मृतीरुपाने साऱ्या भारतकुळाला आदर्शवत ठरली आहे. शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप, छत्रपतींचा इतिहास आपण ऐकतो, पोवाडे, शूर मावळ्यांची तलवारबाजी, दांडपट्टा, लेझीम व घोड्यावरचा रपेट या शिवकालीन पराक्रमाच्या पाऊलखुणा शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी दिसत होत्या.
सकाळी पेणच्या गुरुकुल प्रशालेच्या सुमतीदेवी विद्यालय व इंग्रजी माध्यमिक प्रशालेचे शिवजयंती निमित्त पोवाडे, शिवचरित्रावर आधारित गड आला पण सिंह गेला, प्रतापगड अझफलखान भेट व महाराष्ट्राची लोकधारा असे लेझीम, तलवारबाजी व गीत गायन करून शालेय कार्यक्रमात बहारदार रंगत आणली. तर सकाळी ९ वाजता शिवाजी चौकातील छ. शिवरायांच्या पुतळ्याला विविध संघटनांसह पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील व अनेक शासकीय कार्यालयातर्फे शिवपुतळ्यास पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.
शिवसंग्राम संघटनेतर्फे सायंकाळी ५ वाजता सबंध पेण शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करून शिवजयंतीचा उत्साही माहोल पेणच्या नाक्यानाक्यासह सबंध पेण शहरात फिरविण्यात आला. शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा व फेटे,पागोट्यांसह पालखीचे आयोजन केले. मैत्री ग्रुपतर्फे पेणच्या महात्मा गांधी गं्रथालयाच्या पटांगणावर शिवचरित्रावर आधारित पोवाड्याचा कार्यक्रम झाला. ग्रामीण परिसरातही विविध कार्यक्रम व क्रीडा सामन्यांचे आयोजन केले होते.
(आणखी वृत्त/४)

४महाड : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी, रायगडवाडी, टकमकवाडीतील तरुणांच्या रायगड युवक विकास संघ या संघटनेने प्रतापगड ते किल्ले रायगड शिवज्योतीचे आयोजन केले होते. सकाळी सहा वाजता निघालेली ज्योत गुरुवारी महाड शहरामध्ये सकाळी आल्यानंतर महाडकर नागरिकांच्यावतीने शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले.
४शिवप्रभूंच्या सहवास ज्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पूर्वजांना मिळाला ते सर्व भाग्यवान आहेत. रायगडच्या पायथ्याशी असलेली बहुतांशी वसाहत धनगर समाजाची असून शिवकाळापासून या समाजाचे वास्तव्य किल्ले रायगडाच्या सान्निध्यामध्ये आहे.
४तिसऱ्या वर्षी प्रतापगड ते किल्ले रायगड शिवज्योत काढण्यात येत आहे. सुमारे ६० - ७० तरुण शिवभक्त सुमारे ४० किमीच्या शिवज्योत दौडमध्ये सहभागी होत असून सर्व तरुण किल्ले रायगड परिसरात राहाणारे आहेत.
 

 

Web Title: Mancha mujra to Shiv Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.