- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेच्या एकूण ९१ मंड्या आहेत. यापैकी ५ मंड्यांमध्ये गाळेधारकांच्या व ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत, सुधारणा व आवश्यकतेनुसार पुनर्रचना करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये माहिमचे सुप्रसिद्ध गोपी टँक मार्केट, दादरच्या प्लाझा चित्रपट गृहाजवळील क्रांतीसिंह नाना पाटील मार्केट, नळबाजार परिसरातील मिर्जा गालिब मार्केट आणि ग्रँट रोडचे लोकमान्य टिळक मार्केट यांचा समावेश आहे. पाचही मार्केटचा कायापालट करण्यासाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.माहिम परिसरातील गोपी टँक मार्केटमध्ये एकूण ४७२ गाळेधारक आहेत, तर दादरच्या क्रांतीसिंह नाना पाटील मार्केटमध्ये ३२३ गाळेधारक आहेत. या दोन्ही मार्केटमध्ये दुरुस्ती, पुनर्रचना करण्यात येणार आहे. दादर पश्चिमेतील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्केटमध्ये ३८४ गाळेधारक आहेत. नळबाजारात मिर्जा गालिब मार्केटमध्ये ९०७ गाळेधारक आहेत, तर ग्रँट रोडमधील लोकमान्य टिळक मार्केटमध्ये ५१० गाळेधारक आहेत. या तीनही मार्केटचे छत हे पालिकेच्या म. जोतिबा फुले मार्केटच्या (क्रॉफर्ड मार्केट) धर्तीवर करण्यात येणार आहे.अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापरपाचही मंड्यांमध्ये सध्या असणारी विद्युत वितरण व्यवस्था पूर्णपणे बदलण्यात येणार आहे, तसेच कुठेही लटकत्या वायरी व त्यांना लटकवलेले हलते दिवे असणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार आहे. परिणामकारक विद्युत व्यवस्थेसाठी अत्याधुनिक पद्धतीच्या साधनसामग्रीचा वापर केला जाणार आहे.- संजय कुऱ्हाडे, सहायक आयुक्त, बाजार विभागअसे होणार बदल- पाचही मार्केटमध्ये पुनर्रचना करताना, हवा योग्य प्रकारे खेळती राहून गाळेधारकांसह ग्राहकांनीदेखील सुखकर वाटावे, यासाठी ‘एक्झॉस्ट पंखे’, तर छतामध्ये गरजेनुसार ‘हॉट एअर एक्स्ट्रॅक्टर्स’ आवश्यक तेवढे बसविले जाणार आहेत.- पाचही मंड्यांमध्ये ग्राहकांना ये-जा करणे अधिक सुविधाजनक व्हावे, यासाठीदेखील आवश्यक ते बदल पुनर्रचनेदरम्यान केले जाणार आहेत.