प्रा. मंदार पूरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:07 AM2018-06-12T05:07:38+5:302018-06-12T05:07:38+5:30

साठ्ये महाविद्यालय आणि बिर्ला महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाचे प्राध्यापक मंदार पूरकर यांचे सोमवारी रात्री निधन झाले. पूरकर हे बातमीदारी, पत्रकारिता आणि इतिहास हे विषय शिकवत.

Mandar Purkar passed away | प्रा. मंदार पूरकर यांचे निधन

प्रा. मंदार पूरकर यांचे निधन

Next

मुंबई : साठ्ये महाविद्यालय आणि बिर्ला महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाचे प्राध्यापक मंदार पूरकर यांचे सोमवारी रात्री निधन झाले. पूरकर हे बातमीदारी, पत्रकारिता आणि इतिहास हे विषय शिकवत. विद्यार्थीप्रिय असलेल्या पूरकर यांच्या आकस्मिक निधनामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पूरकर हे गंभीर आजाराने त्रस्त होते. जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पूरकर यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. बदलापूर येथील घरून त्यांची अंत्ययात्रा निघेल. तत्पूर्वी मंदार पूरकर यांच्या पार्थिव अंत्यदर्शनासाटठी बदलापूर पश्चिम येथील बाजारपेठ हॉल येथे सकाळी ८ ते १० या वेळेत ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर मांजर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पूरकरांनी अनेक माध्यमांमध्ये काम केले आहे. ‘भारतीय प्रादेशिक पत्रकारिता’
हे मराठी भाषेतील वाचकप्रिय पुस्तक त्यांनी लिहिले. इंग्रजीतही ‘कंन्टेप्ररी इश्शू’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.

Web Title: Mandar Purkar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.