काँक्रीटीकरणाचा विलंब टाळण्यासाठी कार्यादेश; मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 10:18 AM2024-06-18T10:18:39+5:302024-06-18T10:21:42+5:30

पावसाळा संपल्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने मार्गी लागण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

mandate to avoid delay in concretization in mumbai bmc are in action mode | काँक्रीटीकरणाचा विलंब टाळण्यासाठी कार्यादेश; मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

काँक्रीटीकरणाचा विलंब टाळण्यासाठी कार्यादेश; मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

मुंबई : पावसाळा संपल्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने मार्गी लागण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कामांसाठी ज्या कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे, त्यांना कार्यादेश (वर्क ऑर्डर) दिला जाणार आहे. पावसाळ्यामुळे काँक्रिटीकरणाची कामे थांबवण्यात आली आहेत. 

सध्या कार्यादेश देऊनही मागील वर्षी शहर भागातील कामे रखडली होती. त्यामुळे जुन्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून नव्याने निविदा काढल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात आणखी ४०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निविदा यापूर्वीच मागवल्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कंत्राट दिले नव्हते. आता मात्र लोकसभा निवडणूक संपल्यामुळे कंत्राट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कंत्राटदारांशी चर्चा करून अंतिम कंत्राटदार निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सगळी कामे पावसाळ्यानंतरच सुरू होणार आहेत.

पुन्हा आचारसंहिता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता रस्त्यांच्या कामात अडथळा ठरेल की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाचा सल्ला घेण्यात येईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

१) शहर विभाग ९७ किमी

२) पूर्व उपनगर ७० किमी

३) पश्चिम उपनगर २५३ किमी

रस्त्यांची कामे-

१) २०२२-२३ सालासाठीचा खर्च शहर - १३६२ कोटी ३४ लाख ६ हजार

२) पूर्व उपनगर-  ८६४ कोटी १७ लाख ६१ हजार

३) पश्चिम उपनगर - ३ हजार कोटी

२०२५ सालापर्यंत सर्व रस्ते काँक्रीटचे मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे निर्देश मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेला दिले होते. त्यानुसार ६०७८ कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा मागवण्यात
आल्या आहेत. अनेक ठिकाणी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

Web Title: mandate to avoid delay in concretization in mumbai bmc are in action mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.