Join us  

माणदेशी महोत्सव मुंबईमध्ये

By admin | Published: January 04, 2017 12:16 AM

माणदेशातील खाद्यप्रकार लोककला, लोकसंगीत, तेथील ग्रामीण पारंपरिक खेळ आणि हस्तकला यांचा अनुभव मुंबईकरांना ५ ते ८ जानेवारी या काळात घेता येणार आहे. मुख्य म्हणजे प्रथमच मुंबईत माणदेशी महोत्सव होत आहे.

मुंबई : माणदेशातील खाद्यप्रकार लोककला, लोकसंगीत, तेथील ग्रामीण पारंपरिक खेळ आणि हस्तकला यांचा अनुभव मुंबईकरांना ५ ते ८ जानेवारी या काळात घेता येणार आहे. मुख्य म्हणजे प्रथमच मुंबईत माणदेशी महोत्सव होत आहे.आतापर्यंत हा महोत्सव साताऱ्यातच होत असे. यंदा प्रथमच तो मुंबईत होत असून, त्यातून महिला व महिला बचत गटांना चालना व रोजगार मिळवून देणे हा हेतू आहे. याशिवाय माणदेशाची खासियत असलेले कुंभारकाम, सुतारकाम, लोहारकाम यांचे दर्शन घडेल. तसेच बारा बलुतेदारांकडून तयार करण्यात आलेल्या वस्तूही प्रदर्शनात असतील. माणदेशी गजी नृत्य, चंदाताई तिवाडी यांचे आख्यान ही या महोत्सवाची वैशिष्ट्ये असतील. महिला खेळाडूंच्या कुस्त्या, देवीचा गोंधळ, कीर्तन आदीही या ठिकाणी होणार आहे. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या कलांगणात तसेच सभागृहात हा महोत्सव ५ ते ८ जानेवारी या काळात सकाळी १0. ३0 वाजल्यापासून रात्री ८. ३0 वाजेपर्यंत हा महोत्सव चालेल. (वाणिज्य प्रतिनिधी)