मुंबई महापालिका निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, भाजपच जिंकणार असल्याचा लोढांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 04:06 AM2021-04-03T04:06:22+5:302021-04-03T04:07:21+5:30

Mumbai Municipal Corporation election News : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. या ऑनलाईन बैठकीत विविध प्रस्ताव संमत करण्यात आले.

Mangal Prabh Lodha claims that BJP will win the Mumbai Municipal Corporation elections under the leadership of Fadnavis | मुंबई महापालिका निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, भाजपच जिंकणार असल्याचा लोढांचा दावा

मुंबई महापालिका निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, भाजपच जिंकणार असल्याचा लोढांचा दावा

Next

मुंबई : विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली आगामी मुंबई महापालिका निवडणुका लढविण्याचा प्रस्ताव मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने संमत केला. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत खऱ्या अर्थाने भगवा फडकेल, असा विश्वास मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.|

आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. या ऑनलाईन बैठकीत विविध प्रस्ताव संमत करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच राज्य सरकारचा भ्रष्टाचार आणि अपयश उघडकीस आणले. त्याबद्दल कार्यकारिणीने फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला. मुंबई प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी हा अभिनंदन प्रस्ताव मांडला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी पोलीस विभागातील बदली व नियुक्ती रॅकेटचा पर्दाफाश केला. राज्य सरकारचा भ्रष्टाचार व अपयश उघडकीस आणले  हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे भातखळकर म्हणाले. फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी मुंबई महापालिका निवडणुका लढविण्याबद्दलचा प्रस्ताव सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने मंजूर झाल्याबद्दल लोढा यांनी आभार मानले. यावेळी, आमदार आशिष शेलार, अमित साटम, मनीषा चौधरी, योगेश सागर, पराग अळवणी, सुनील राणे यांच्यासह सर्व आमदार, नगरसेवक व जिल्हाप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Mangal Prabh Lodha claims that BJP will win the Mumbai Municipal Corporation elections under the leadership of Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.